
नांदगाव (गणतंत्र न्यूज) त्र्यंबकेश्वर येथे साधू महंताची कुंभ मेळयाच्या संदर्भात बैठक होती त्या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी काही पत्रकार नाशिक येथून त्र्यंबकेश्वर गेले होते.. त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रवेश शुल्क भरावे लागते.. मात्र आम्ही पत्रकार आहोत आणि बातमी कव्हर करण्यासाठी आलो आहोत. असे वारंवार सांगूनही पार्किंग वसुली कर्मचारी ऐकायला तयार नव्हते.. पत्रकार वरिष्ठांना फोन करीत असतानाच वसुली करणाऱ्या गुंडांनी पत्रकारांना मारहाण करायला सुरुवात केलीयामध्ये झी 24 तासचे योगेश खरे, पुढारी न्यूजचे किरण ताजणे, साम टीव्हीचे अभिजित सोनवणे आणि अन्य दोन पत्रकार जखमी झाले या पत्रकारावर त्र्यंबकेश्वर तसेच नाशिक येथील रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.. आम्ही आपल्या माध्यमांतून शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधू इच्छितो की, मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून हल्लेखोरांना अद्दल घडेल अशी कारवाई करावी. हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही तर राज्यातील सर्व पत्रकार रस्त्यावर उतरतील, महाराष्ट्रात 2019 मध्ये पत्रकार संरक्षण कायदा झाला.. मात्र सात वर्षे झाली तरीही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले आहेत. पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीचे नोटिफिकेशन काढून सरकारने तातडीने महाराष्ट्रात हा कायदा लागू करावा अशी मागणी या प्रसंगी समस्त नांदगाव तालुका पत्रकारांनी निवेदन नांदगाव पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांना देण्यात आले. यावेळी तालुक्यातील सर्व पत्रकार तसेच फोटोग्राफी असोसिएशन चे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
