
मनमाड ( प्रतिनिधी )येथील संत बार्णबा प्राथमिक विद्यालयात भारत सरकार युवा कार्यक्रम खेल खुद मंत्रालय नियोजित नशा मुक्ती आंदोलनांतर्गत विद्यार्थ्यांद्वारे कोणत्याही प्रकारची नशा करणार नाही किंवा अमली पदार्थांचे सेवन करणार नाही अशा प्रकारची शपथ देऊन मुख्याध्यापक श्री. अहिरे सर यांनी विद्यार्थ्यांना नशा सेवनाचे दुष्परिणाम त्याचप्रमाणे व नशेच्या आहारी गेलेल्या कुटुंबाचे कसे हाल होतात याविषयी माहिती सांगितली. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सौ. आहिरे मॅडम,सौ.तांबे मॅडम , त्रिभुवन मॅडम, रणधीर मॅडम,शेल्टे सर , विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

