
मनमाड (प्रतिनिधी) येथील संत बार्णबा माध्यमिक विद्यालयात भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र जी मोदी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी श्रीमती शेजवळ मॅडम यांच्या नियोजनाखाली विविध विषयावर आधारित निबंध स्पर्धा आयोजित केली होती या निबंध स्पर्धेमध्ये इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला देशभक्तीपर विषयावर लेखन करीत अनोख्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा केला त्याचप्रमाणे श्रीमती बेन्सन मॅडम यांच्या नियोजनाखाली देशभक्तीपर विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती आपल्या कल्पनाशक्तीवर देशभक्तीपर सामाजिक विषयावर विद्यार्थ्यांनी सुंदर अशी चित्र काढली. या स्पर्धांचे उद्घाटन प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री डी यु अहिरे सर तसेच माध्यमिक विभागाचे श्री व्हि यु कराड सर यांनी केले माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक श्री कराड सर यांनी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री वेताळ सर यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप केले कार्यक्रमास श्री त्रिभुवन सर श्री पाटील सर श्री रसाळ सर श्री पगारे सर बोरसे सर अर्चना शेजवळ मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
