
नांदगाव (वार्ताहार ) शंकराचार्य न्यास संस्थेतर्फे संस्कृत भाषेतील उत्कृष्ट विद्यार्थानां प्रारितोषिक व प्रमाण देवून सत्कार करण्यात आला “ना. शि. प्रसारक मंडळ नाशिक संचलित व्ही जे हायस्कुल नांदगाव या शाळेतील इ.८वी ते १०वी तील प्रत्येक तुकडीतून संस्कृत भाषेत प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले .

विद्यालयातील एकूण २३ विद्यार्थ्यांना सदर बक्षिसे देण्यात आली .यावेळी अध्यक्ष मा.संजीव धामणे , मा. मुख्यध्यापक श्री ल. ना.ठाकरे , उपमुख्यध्यापक डॉ.श्री नांदुरकर ,टी.एम.बोर्ड सदस्य मा.श्री भास्कर मधे,मा.सौ रुपाली झोडगेकर आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मा . मुख्याध्यापकांनी संस्कृत भाषेचे विद्यमान काळातील महत्व व विद्यार्थ्या विषयी समाधान व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांना मिळालेल्या बक्षिसांबद्दल समाधान व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयाचा अधिकाधिक अभ्यास करून अजून भरगोस बक्षिसे मिळवण्याचे आवाहन केले.शंकरचार्य न्यास संस्था ,व ना. शि.प्र. मंडळाचे आभार .

यावेळी बक्षिस पात्र विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. उपस्थित पालकांपैकी सौ .स्फुर्ती देवरे व श्री आढाव यांनी सदर बक्षीसां बद्दल अतिशय समाधान व्यक्त करत शाळेच्या . सर्वच घटकाचे मनस्वी आभार मानले.मा.श्री.संजीवनी धामणे यांनी आपल्या मनोगतातून संस्कृत केवळ भाषा नाही तर ती आपली संस्कृती आहे ,आपले भविष्य घडविणारी आहे असे मत व्यक्त करत विद्यार्थांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील संस्कृत शिक्षिका सौ. रुपाली झोडगेकर यांनी केले. बक्षीस वितरणाचे काम समिती प्रमुख श्रीम. दिपाली सांगळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीते साठी शाळेतील .सर्व पदधिकारी ,सहकारी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले . !
