
तळेगांव (दिंडोरी) येथील उन्नती माध्यमिक विद्यालय तळेगांव दिंडोरी, येथे आज पालक – शिक्षक सहविचार सभेत,विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला, शहीद वीर जवान यशवंत अर्जुन ढाकणे यांच्या स्मृतिपित्यर्थ विद्यालयांमध्ये माझी सैनिक संघटना यांच्या वतीने वकृत्व , निबंध व हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती दिडशेहुन अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत गुणवंत विद्यार्थी कु, अवनी कथार, तेजल खरात, सृष्टी चौधरी, रितिका ढाके, जयेश चौधरी, सौरव कतोरे, श्रुती देशमुख,यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र पितृभक्त सर तसेच श्री दत्तूभाऊ घुगे, श्री मोहन ढाकणे, श्री गोविंद ढाकणे, श्री विनोद बेंडकुळे श्री शरद ढाकणे, श्री प्रमोद कथार श्री बाळासाहेब भालेराव, श्री अनिल उमरे श्री दिपक ढाकणे, व श्री किशोर क्षिरसागर सर यांच्या हस्ते ट्रॉफी , प्रशस्तीपत्र व पुष्पहार देऊन करण्यात आला, तसेच शाळेत शासकीय क्रीडा स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड झालेले विद्यार्थी कु संस्कृती घुगे, समृध्दी खुर्दळ, विदिशा सोलसे , श्रावणी भालेराव कु निशांत दिवे यांचा देखील ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री किशोर क्षिरसागर सर व पवार सर यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र पितृभक्त सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत भाग घेऊन यश संपादन करून शाळेचे व गावचे नाव लौकिक करावे असे आवाहन केले. कार्यक्रमा चे सूत्रसंचालन श्री किशोर क्षिरसागर सर यांनी केले तर आभार श्री जाधव सर यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले
