
नांदगाव (प्रतिनिधी). नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा संविधान आर्मी नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मुक्ताराम बागुल यांनी दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी विविध मागण्यासाठी बेमुदतआमरण उपोषण सुरू केले होते. या अनुषंगाने नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी यांना दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी अपात्र घरकुल आभार त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात यावा केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दोन दिवसात देण्यात यावा असा आदेश देण्यात आला होता परंतु ग्रामपंचायत अधिकारी आर एम मगर यांनी अद्याप पर्यंत अपात्र लाभार्थ्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवलेला नसून उपोषण करते मुक्ताराम बागुल यांना माहिती आठ ते दहा दिवस होत आले असून देखील अद्याप पर्यंत देण्यात आलेली नाही. यामुळे यात काय गौड बंगाल आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत नांदगाव पंचायत समितीने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांपैकी पात्र अपात्र लाभार्थ्यांची यादी मागवली होती. त्या अनुषंगाने रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांना प्रधानमंत्री आवास योजना घरकुल लाभार्थी पात्र करणे बाबत संदर्भ (१) नांदगाव पंचायत समिती कडील घरकुल विभागाचे पत्र जावक क्रमांक पंसना/प्रमंआयो 05/2025 (२) ग्रामपंचायत मासिक सभा दिनांक 24 जानेवारी 2025 च्या रिपोर्ट सरपंच ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत तालुका नांदगाव यांनी नांदगाव पंच समिती यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की सन 2024-2025 PMAY-G टप्पा- 2 योजनेअंतर्गत मौजे रोहिले बुद्रुक येथील प्रपत्र ट यादीत समाविष्ट असलेल्या घरकुल लाभार्थी उद्दिष्ट देण्यात आलेले आहे त्यापैकी नांदगाव पंचायत समितीच्या पत्रावरून ऑनलाइन कुटुंब पत्रकातील अपात्र लाभार्थ्यांची यादी नांदगाव पंचायत समितीला दिली होती. यात आठ लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आल्याचे नांदगाव पंचायत समितीला दिले होते. अपात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता पंधरा हजार रुपये वर्ग केला होता. आज जवळजवळ एक ते दीड वर्ष होत आले असून देखील संबंधित अपात्र घरकुल लाभार्थ्यांची नावे पात्र लाभार्थ्यांच्या यादीमधून कमी करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे नांदगाव पंचायत समिती मधील संबंधित अधिकाऱ्याने अपात्र घरकुल लाभार्थ्यांच्या नावे पहिला हप्ता वर्ग करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासंदर्भात मुक्ताराम बागुल यांनी आमरण उपोषण दिनांक 10 सप्टेंबर 2025 पासून सुरू केले होते. त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांनी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी आर एम मगर यांना सदर व पात्र लाभार्थ्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्या संदर्भात दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी पत्र देऊन दोन दिवसात अहवाल पाठवण्यात यावा असे म्हटले होते. परंतु ग्रामपंचायत अधिकारी यांनी आठ ते दहा दिवस होऊन देखील अपात्र घरकुल लाभार्थ्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात आलेले नाही. सदर बोजा चढविण्यासंदर्भात नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, संबंधित अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे तसेच आहेत. यावर लवकर दखल घेण्यात येईल असे तोंडी सांगितले. या सावळा गोंधळामध्ये अधिकारी आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण जर अपात्र घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता पंधरा हजार रुपये तसाच आहे तर संबंधित अपात्र घरकुल लाभार्थ्यांना पैसे वसुली संदर्भात पत्र का दिले ? एवढेच नव्हे तर त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवण्या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी बुद्रुक यांना पत्र दिले.? असा सवाल मुक्ताराम बागुल यांनी केला आहे. म्हणजेच याचा अर्थ सदरचे प्रकरण दडपण्याचा प्रकार संबंधित करीत असल्याचे सिद्ध होत आहे. परंतु आठ दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा अमरण उपोषण करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास शासन प्रशासन व अधिकारी राहतील असा इशारा मुक्ताराम बागुल यांनी बोलताना दिला आहे.
