
नांदगाव ( प्रतिनिधी ) शाळा आणि समाज यांना जोडणारा सेतू म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती होय.असे प्रतिपादन,कासारी गावचे सरपंच काशिनाथ महादू काळे यांनी सत्कार प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी येथे केले.मोरेवाडी शाळेच्या वतीने सरपंच काशिनाथनाना काळे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी त्यांनी वरील उद्गार काढले.शाळेच्या मूलभूत गरजा सोडविण्यासाठी योग्य तो पाठपुरावा प्रशासनास करण्यास शालेय व्यवस्थापन समितीची भूमिका महत्त्वाची असते.मी कासारी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच म्हणून आपल्या शाळेस पिण्याच्या पाण्याची सुविधा दोन-तीन दिवसात उपलब्ध करून देतो,अशी ग्वाही त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिली.

याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तुकाराम मोरे,माजी अध्यक्ष कैलास विश्वनाथ मोरे,पालक समाधान सुकदेव मोरे,कैलास अशोक मोरे,यादव सुकराम मोरे,काभू रतन मोरे,शिक्षणतज्ञ अविनाश महादू कर्नर,भिमबाई दशरथ मोरे,रोहिदास कचरू पवार,गौतम भीमा राठोड,बाळू अंकुश मोरे, स्वयंपाकी जिभाऊ पांडुरंग मोरे,मुख्याध्यापक गणेश बागुल,उपशिक्षिका योगिता कापुरे,मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी शितल मोरे,अंगणवाडी कार्यकर्ती सुनिता राठोड,मदतनीस छाया सानप व विद्यार्थी उपस्थित होते.याप्रसंगी नशामुक्त अभियानांतर्गत नशामुक्तीची शपथ घेण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक बागुल सर यांनी केले,तर योगिता कापुरे मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले.
