
नांदगाव ( गणतंत्र न्यूज )क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे व स्व. विश्वासराव रंधे क्रीडा संकुल, एस. पी. डी. एम. महाविद्यालय शिरपूर, यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर येथे विभागीय बॉक्सिंग स्पर्धा दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी संपन्न झाल्या, या स्पर्धेत नांदगाव महाविद्यालयातील 19 वर्षे वयोगटातील सहा मुलींचा सहभाग होता. या स्पर्धेत एकूण पाच मुलीचे प्रथम व द्वितीय क्रमांकाने विजयी झाल्या. त्यात 1)कोमल विलास भगत (प्रथम)2)साक्षी प्रमोद सोनवणे (प्रथम)3)वैष्णवी सचिन कुलते (प्रथम)4) सोनाली दिपक पठाडे (व्दितीय)5)खुशी अनिल व्हडगर हवितीय व्दितीय प्रथम क्रमांक मिळविलेल्या तीन विद्यार्थिनीची रायगड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दिनांक 18 /09/ 2025 रोजी मविप्र सरचिटणीस ॲड. नितीनभाऊ ठाकरे, मविप्न नांदगाव संचालक अमितभाऊ बोरसे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एन. भावरे, उपप्राचार्य डी. एम. राठोड विज्ञान विभाग इन्चार्ज पी.एम. आहेर, कॉमर्स आणि कला विभागाचे इन्चार्ज बोरसे सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी बी. के. पवार तसेच महाविद्यालयातील सर्व ज्येष्ठ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना योग्य व तांत्रिक खेळाचे मार्गदर्शन क्रीडा संचालक लोकेश गळदगे, उपप्राचार्य व क्रीडाशिक्षक डी.एम. राठोड आणि क्रीडा विभाग सहाय्यक सचिन आहेर यांचे लाभले……
