
नांदगाव (गणतंत्र न्यूज), दि. २० सप्टेंबर१८५ वर्षांची परंपरा लाभलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात ‘सावाना’ संस्थेकडून जाहीर करण्यात आलेल्या ‘जयश्री पाठक कविता संग्रह पुरस्काराने’ नांदगावकर कवयत्री प्रतिभा सुरेश खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ या कवितासंग्रहाला सन्मानित करण्यात आले

आहे.नाशिक जिल्ह्यातील हा एक मानाचा साहित्यिक पुरस्कार असून त्याबद्दल कवयत्री प्रतिभा खैरनार यांनी ‘सावाना’चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी तसेच सर्व नाशिककर हितचिंतकांचे आभार मानले आहेत. सहविजेत्यांनाही त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. नांदगाव येथील म.सा.प.अध्यक्ष प्रा.सुरेश नारायणे, सचिव /कार्यवाह कवी. काशिनाथ गवळी, उपाध्यक्ष ॳॅड. सचिन साळवे , कोषाध्यक्ष श्रीमती विद्या माळी, व पदाधिकारी तसेच सदस्य यांनी कवयत्री प्रतिभा खैरनार यांचे अभिनंदन केले व पुढील लेखनास शुभेच्छा दिल्या.
