
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०३४ वा दिवस गृहस्थच समाजजीवनाचे केंद्र. वित्त संपादन आणि त्याचा सत्कार्यात व्यय ही त्याच्या दृष्टीने उपासनाच होय. कारण, एखाद्या संन्याशाला आपल्या गुहेत राहून उपासना केल्याने स्वतःच्या मुक्तिलाभासाठी जे साहाय्य होते, अगदी तेच, सदुपायाने व सदुद्देश्याने धनशाली बनण्याचा प्रयत्न करण्याने गृहस्थालाही लाभत असते. कारण, त्या दोघांहिमधे, ईश्वरावरील आणि ईश्वराचे म्हणून जे काही आहे त्यावरील भक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन केलेल्या आत्मत्याग-आत्मसमर्पणरूपी एकाच धर्माचे केवळ दोन विभिन्न विकास झालेले आपल्याला आढळून येत असतात. *स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २९ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७
★ भाद्रपद वद्य /कृष्ण १४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. २० सप्टेंबर २०२५
★ पितृपक्ष चतुर्दशी श्राद्ध ★ १८९८ “सकाळ” वृत्तपत्राचे संस्थापक संपादक, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष, भारतीय पत्रकारीतेचे पितामह, पद्मविभूषण नारायण भिकाजी तथा नानासाहेब परुळेकर यांचा जन्मदिन.
★ १९३३ भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, सामाजिक कार्यकर्त्या, ४५० ग्रंथाच्या लेखिका, थिऑसाॅफिस्ट, होमरुल लीगच्या संस्थापिका अॅनी बेझंट यांचा स्मृतिदिन.
★ १९६५ भारत पाकिस्तान युध्दात लाहोर आघाडीवर लढतांना शहिद झालेले, दाभाडी ता. मालेगाव (नाशिक) चे भूमिपुत्र, भारतीय जवान हुतात्मा दगा लोटन निकम यांचा स्मृतिदिन.
