
जॉईन फॉर पीस शांतता पुरस्कार २०२५ जाहीर*श्री. जन्मेजयराजे भोसले, मा. आमदार श्री. विठ्ठल कटकोंड, ऍड यु. एन. बेरिया, सौ. अनिता फॅरन ब्राँखस्ट आणि प्रार्थना फाउंडेशन पुरस्काराचे मानकरी मानवतेची सेवा आणि सामुदायिक सौहार्द वाढविण्याचे ध्येय बाळगणारी जॉईन फॉर पिस ही एक अग्रगण्य स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट समाजातील विविध वर्गातील लोकांमध्ये एकोप्याची भावना निर्माण करणे आणि शांतता, समता, व मानवाधिकारांची जपणूक करणे आहे.जॉईन फॉर पीस संस्था समाजात सामाजिक सलोखा निर्माण होवून शांतता व बंधूभाव निर्माण होण्यासाठी सध्या प्रयत्नशील आहे, याचाच एक भाग म्हणून २१ सप्टेंबर जागतिक शांतता दिनाचे औचित्य साधून समता बंधूता या तत्वांना प्रमाणित मानून मानवता, सामाजीक ऐक्य, शांतता व राष्ट्रीय एकत्मता जोपासण्याचे काम करण्या-या व्यक्तींना मागील सहा वर्षापासून “JP शांतता पुरस्कार ” ने सन्मानीत करण्यात येत आहे.JP शांतता पुरस्कार-२०२५ पुरस्काराचे मानकरी म्हणून मा. श्री. जन्मेजयराजे भोसले (अध्यक्ष, श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट), मा. आमदार श्री. विठ्ठल कटकधोंड (आमदार नागठान, विजयपूर), ऍड यु. एन. बेरिया (माजी महापौर, सोलापूर), सौ. अनिता फॅरन ब्राँखस्ट (सामाजिक महिला कार्यकर्त्या) व प्रार्थना फाउंडेशन यांची निवड झालेली आहे. निवड झालेल्या मान्यवरांचा यथोचित गौरव करण्यात येणार असून सन्मानपत्र, गौरवचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.या कार्यक्रमास शहारातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. प्रा. डॉ. चंद्रकांत चव्हाण (प्राध्यापक व इतिहास तज्ञ, वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर) यांच्या हस्ते जागतिक शांतता दिनी म्हणजेच रविवार दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी संध्या. ६.०० वा. उर्दु घर, सिव्हील हॉस्पिटल समोर, सोलापूर येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. अशी माहिती पुरस्कार निवड समितीने दिली आहे. पुरस्काराची निवड झालेल्या मान्यवरांवर सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तरी या शांतता पुरस्कार सोहळ्यास सर्व शांतताप्रिय भारतीय नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. जैनोद्दीन मुल्ला यांनी केले आहे.
