
सिन्नर (प्रतिनिधी) : मातोश्री चांडक कन्या विद्यालय सिन्नर आयोजित कै. लक्ष्मीबाई लेले तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा यंदा ६२ व्या वर्षी उत्साहात पार पडली. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटांतील एकूण १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनीता कर्डीले यांनी केले.उद्घाटन मा. जि. प. अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या शितल सांगळे व प्रमुख पाहुणे रवींद्र रास्वलकर यांच्या हस्ते झाले.शितल सांगळे म्हणाल्या, “वक्तृत्वकला अवगत करा, वाचन वाढवा” असे सांगत गरीब विद्यार्थ्यांच्या फी साठी व शाळेसाठी डिजिटल साहित्य देण्याचा शब्द दिला.रवींद्र रास्वलकर यांनी “स्पर्धेमुळे विचारांची स्पष्टता व आदर्श वक्ते तयार होतात,” असे सांगितले.समारोप प्रसंगी ॲड. आनंद पोंक्षे व राहुल मुळे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. ॲड. पोंक्षे यांनी “वाचनामुळे वक्तृत्व समृद्ध होते” असा संदेश दिला, तर राहुल मुळे यांनी स्पर्धेचा इतिहास व संस्थेचे उपक्रम सांगितले.या वेळी शालेय समिती अध्यक्ष ॲड. श्रीराम क्षत्रिय, पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष गोरक्ष सोनवणे, मुख्याध्यापिका सुनिता कर्डिले, पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे तसेच तालुक्यातील विविध शाळांचे शिक्षक-पालक उपस्थित होते.परीक्षक म्हणून प्रभाकर गंगावणे, गोविंद मोरे, सुरेखा पंडित, रवींद्र कांगणे, मंगल सांगळे, गायत्री कर्नाटकी, योगिता पवार, दर्शना बिन्नर यांनी काम पाहिले.स्पर्धा नियोजन नीलिमा दुसाने व राजहंस माळी यांनी केले. परिचय उमा लोकरे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रिया कुलकर्णी व तृषाली बोडके यांनी केले, तर आभार उत्तम भोये यांनी मानले

.—स्पर्धेचा अंतिम निकाल
प्राथमिक गट (३री–४ थी)
प्रथम : तन्वी शिवाजी पाचोरे (सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालय)
द्वितीय : आयुष मोहन बोडके (एस. जी. पब्लिक स्कूल)तृतीय : श्रावणी ऋषिकेश उगले (संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर)माध्यमिक गट (५वी–७वी)
प्रथम : आरोही योगेश ठोके (चांडक कन्या विद्यालय)
द्वितीय : पूजा किशोर खैरनार (जि. प. प्राथमिक शाळा, मुसळगाव)
तृतीय : पूनम परसराम अवचार (सावित्रीबाई पवार प्राथमिक विद्यालय)
माध्यमिक गट (८वी–१०वी)
प्रथम : पूर्वा विनायक आरोटे (वाजे विद्यालय, सिन्नर)
द्वितीय : श्रीशा सौरभ मालपाठक (सरदवाडी इंग्लिश मीडियम स्कूल)
तृतीय : दिनेश सिताराम आव्हाड (निर्मला कुलकर्णी विद्यालय, सिन्नर)
उच्च माध्यमिक गट (११वी–१२वी)
प्रथम : संस्कृती सचिन मुंढे (आकाश पब्लिक स्कूल जुनियर कॉलेज)
द्वितीय : प्रणाली जयराम लोणारे (महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेज)
तृतीय : प्रांजल अनिल नागरे (ब्रह्मानंद कॉलेज, दोडी)
