
..!श्रीगोंदा तालुक्यातील युवा कवी व लेखक कृष्णा घोलप यांची आळंदीच्या शिव प्रतिष्ठान संस्थेकडून महाराष्ट्र राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार २०२५ साठी निवड करण्यात आली आहे. कृष्णा घोलप यांनी आजपर्यंत साहित्य साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येईल. घोलप यांनी ईयत्ता सहावीत असताना त्यांच्या पेडगाव येथील भूईकोट किल्ल्यावर एक अहवाल लिहिला होता. त्याचेच रुपांतर पुढे अभ्यास आणि संशोधनातून पुस्तकात झाले. त्यावेळी घोलप हे ईयत्ता बारावीत शिकत होते. त्यांच्या त्या शौर्यतिर्थ पुस्तकाचे प्रकाशन पदवीच्या शिक्षणादरम्यान झाले. पेडगावचा दुर्लक्षित किल्ला त्या पुस्तकाच्या रुपाने तब्बल एक हजार घरापर्यंत पोहोचला. अन् अशा प्रकारे सुरू झाला कृष्णा या विद्यार्थ्याचा साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय प्रवास!मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात वाढलेल्या कृष्णाचे नुकतेच ईंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही केवळ आवड, जिद्द आणि प्रयत्नांच्या जोरावर कृष्णाने मराठी साहित्य जगतात आपले एक स्थान निर्माण केले आहे.’ *शौर्यतिर्थ* , *भरारी* , *Two Saints One Thought* ‘ यांसारखे प्रकाशित ग्रंथ तर, ‘ *दलित साहित्याचं पहिलं पान* ‘, *चार लोकं काय म्हणतील* ?, *मी राजा बळी* , *हिंदोळा* यांसारखी आगामी पुस्तके येवढी साहित्य संपदा कृष्णा यांच्या नावावर आहे. त्याच्या Two Saints One Thought पुस्तकाचे कौतुक युरोप खंडापर्यंत झाले. घोलप यांची एक काव्यरचना सध्या श्रीगोंद्यचा महामानव बाबा आमटे संस्थेचे *संस्थागीत* आहे.श्रीगोंद्यातील पेडगावच्या युवा साहित्यिकास मिळालेला हा बहुमान अवघ्या पंचक्रोशीतील युवकांना प्रेरणादायी ठरणार आहे.
