
नाशिक ( प्रतिनिधी ) जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक आयोजित स्क्वॅश या क्रीडा प्रकारात न्यू मराठा हायस्कूलच्या अथर्व किरण पवारने जिल्हात तृतीय क्रमांक मिळविला व जळगाव या ठिकाणी होणाऱ्या विभागीय पातळीवर त्याची निवड झाली.या विद्यार्थाचे व त्याला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक बाळासाहेब गायकवाड यांचे मविप्र सरचिटणी ॲड नितीनजी ठाकरे, सर्व पदाधिकारी,नाशिक शहर संचालक ॲड लक्ष्मणजी लांडगे तसेच सर्व संचालक, शिक्षणाधिकारी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर शिंदे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
