
नाशिक:- भगूरचे भूमिपुत्र आणि राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त मुंबईच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त शामराव शिंदे यांच्या सन्मान सोहळ्यानिमित्त रविवार (दि.२१) रोजी निमंत्रित कवींची “काव्यसंध्या” रंगणार आहे. सावानाच्या ग्रंथालयभूषण मु.शं.औरंगाबादकर सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या या काव्यसंध्येत गझलकार प्रा.राजेश्वर शशिकला पांडुरंग शेळके, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश अनुसया पुनाजी पवार, ज्येष्ठ कवयित्री अलका हेमलता संजय कुलकर्णी, युवाकवी प्रशांत उषा दत्तात्रय केंदळे, गोड गळ्याच्या कवयित्री शुभांगी वैजयंता किशोर पाटील हे निमंत्रित कवी सहभागी होणार आहे. सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक संदीप सुलभा वसंतराव देशपांडे करणार आहेत. नाशिककर साहित्यिक आणि रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सजग नागरिक संघाचे अध्यक्ष संजय करंजकर, सावानाचे सहाय्यक सचिव प्रा.सोमनाथ मुठाळ, नाट्यगृह सचिव गणेश बर्वे, परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव, ज्येष्ठ कामगार नेते प्रशांत कापसे, ज्येष्ठ उद्योजक अविनाश कातकाडे, सुप्रसिद्ध विनोदी साहित्यिक संदीप देशपांडे, कवी रवींद्र मालुंजकर आणि साहित्यिक मित्रपरिवाराने केले आहे.
