
*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०३३ वा दिवस* आमच्या पद्धतीचे वर्णन अगदी सहज करता येण्यासारखे आहे राष्ट्रीय जीवनादर्श पुन्हा प्रस्थापित करायचे की झाले. ह्यातच खरे रहस्य आहे. त्याग आणि सेवा हेच भारताचे राष्ट्रीय आदर्श आहेत. भारताने हे दोन आदर्श उत्कटपणे आपल्या जीवनात आणावे म्हणजे बाकी सगळ्या इष्ट गोष्टी आपोआप घडून येतील. या देशात धर्माचा झेंडा कितीही उंच फडकविला तरी ते कमीच आहे. केवळ त्यागानेच भारताचा उद्धार होईल. दर्शन, धर्म वा नीतिशास्त्र म्हणा की मधुरता कोमलता वा मानवजातीविषयी निष्कपट प्रेम वगैरे सद्गुण म्हणा, आमची ही मातृभूमी त्या साऱ्यांचे जन्मस्थान आहे. आमच्या ह्या मातृभूमीतच, या पुण्यभूमीतच धर्माची व तत्त्वज्ञानाची उत्पत्ती आणि परिपोष झाला आहे. येथेच थोर धर्मवीरांचा जन्म झाला आहे. येथे, आणि केवळ येथेच त्यागधर्माचा प्रचार झाला आहे. स्वामी विवेकानंद…
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २८ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७
★ भाद्रपद वद्य /कृष्ण १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. १९ सप्टेंबर २०२५
★ पितृपक्ष त्रयोदशी श्राद्ध ★ १९३६ संगीतशास्त्रकार, हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचा स्मृतिदिन.
★ १९६३ जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेविड लो यांचा स्मृतिदिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
