
प्राचार्य ग.वि.अकोलकर
प्राचार्य ग.वि.अकोलकर मानसिक क्षमता शोधन संस्था नाशिक ही संस्था दरवर्षी शिक्षकांचा त्यांच्या विषयातील योगदानाबद्दल विविध पुरस्काराने गौरव करीत असते, यावर्षीही या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून समारंभाचे प्रमुख अतिथी अर्थतज्ज्ञ डॉ.विनायक गोविलकर यांच्या शुभहस्ते शिक्षकांना गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कारार्थी शिक्षक…
प्राचार्य ग.वि अकोलकर गुरु-शिष्य पुरस्कार / मल्हार अमेय भार्गवे व सौ.माधुरी श्रीकांत कुलकर्णी
प्राचार्य ग.श डोंगरे उपक्रमशील भाषा शिक्षक पुरस्कार/ सौ.रूपाली जितेंद्र झोडगेकर
——————- प्रा.मा.य.गोडबोले उपक्रमशील विज्ञान शिक्षक पुरस्कार/ दत्तात्रय गंगाधर वाणी
श्रीमती मुग्धा जोशी उपक्रमशील मातृभाषा शिक्षक पुरस्कार / राजेंद्र बाळासाहेब सोमवंशी
श्रीमती शुभदा दुष्यंत नाईक उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार /हेमंत नरहरी मोजाड
श्री.विनायक मोहनीराज देशमुख उपक्रमशील कला शिक्षक पुरस्कार / मनीष विठ्ठलराव जोगळेकर
मा.श्रीरंग गुणे उपक्रमशील इतिहास शिक्षक पुरस्कार /राजेश रामदास शिंदे
श्रीमती सुमनबाई जोशी उपक्रमशील क्रीडा पुरस्कार/ स्वप्नील यशवंत कर्पे
श्री.जयंत दत्तात्रय पुराणिक उपक्रमशील हिंदी भाषा शिक्षक पुरस्कार/ सुरेखा अशोक बो-हाडे
श्रीमती कावेरीबाई विनायक देशमुख उपक्रम गणित शिक्षक पुरस्कार/ दावल रामदास नंदन
श्री.श्रीधर माधव कवीश्वर उपक्रमशील प्राथमिक शिक्षक पुरस्कार/श्रीमती दर्शना प्रशांत मोरे
श्रीमती कोकिळाबाई मु. वडाळकर उपक्रमशील विशेष शिक्षक पुरस्कार पूजा उत्तम भालेराव
कै.महेश देसाई शिष्यवृत्ती पुरस्कार रियांश नागेश डोलारे(उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती)सोहम प्रवीण अहिरे ( पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती)
श्री.विश्वास विनायक देशमुख उच्च माध्यमिक स्तरीय गुणवंत विद्यार्थी पुरस्कार भाविक दुष्यंत चोरडिया
काव्यतीर्थ गंगाधर शास्त्री द्वारकानाथ शास्त्री शंख शुक्ल स्मृती पुरस्कार मल्हार चंद्रशेखर चिटणीस
श्री.दत्ता नागपुरे उपक्रम उपक्रमशील कला शिक्षक पुरस्कार श्रीमती विजयालक्ष्मी शशांक मणेरीकर
कै.ल.स.वैद्य स्मृती पुरस्कार भारती बुढाथोकी
वरील प्रमाणे पुरस्कारांची घोषणा संस्थेच्या अध्यक्षा सौ.निशा नाखरे, कार्यवाह सुनील हिंगणे आणि विश्वस्त सौ.अमृता कवीश्वर यांनी जाहीर केले आहे.
सदरचा वर्धापन दिन सोहळा व पुरस्कार वितरण समारंभ शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वा. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था कार्यालय,सिबल हॉटेल जवळ, नाशिक येथे संपन्न होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.
