
पालघर ( नीता राऊत. प्रतिनिधी) मुंबई सेंट्रलवरून संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुटलेली वलसाड फास्ट पसेंजर(59023)ही गाडी सात चाळीस वाजता केळवा रेल्वे स्थानकात आल्यानंतर इंजिन मधून धूर येत असल्याचे लोको पायलटच्या लक्षात आल्याने त्याने गाडी स्थानकात थांबवली.आग जास्तच भडकल्याने रेल्वेप्रशासनाने त्वरित आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले.अडीच तासाच्या अथक प्रयत्नाने आग विझवण्यात यश आले.ह्या आगीमुळे उपनगरी

गाड्यासहित लांब पल्ल्याच्या गाड्याही प्रभावित झाल्या.वसई विरारसहित अनेक स्थानकात त्यांना थांबवून ठेवण्यात आले होते.प्रवासामध्ये बराच काळ गोंधळाचे वातावरण होते.आग नक्की कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झाले नाही.
