
नाशिक (वार्ताहर) – द्वारका परिसर येथील सविता बहुउद्देशीय कल्याणकारी संस्था संलग्न सुशील हॉस्पिटल तर्फे नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित असलेल्या शंभराहून अधिक सभासदांनी मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला. सविता चतुर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत सन २०२४ – २५ या वर्षातील जमाखर्चास तसेच नवीन सदस्यांना मंजूरी देण्यात आली. संस्थेच्या वार्षिक कामकाजाचा आढावा, खर्च तपासणीसाठी ऑडिटरची नेमणूक आदी विषयांवर निर्णय घेण्यात आले.

प्रसंगी अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्ष पदावर नानासाहेब होळकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी विजय राऊत, अनिता महेश भामरे, खजिनदार वैशाली खैरे, सचिव धनंजय चतुर, तात्यासाहेब क्षीरसागर, आर के कुलकर्णी महेश भामरे, उत्तमराव कडलग, शिवाजीराव पाटील, कृषी अधिकारी व भारुड सम्राट अभिनेता राजेंद्र काळे, नीलिमा आढाव, संगीता शहाणे, सोनाली शेलार, कौसल्या पाटील, मनीषा जाधव, गायक कैलास कपाटे, रत्ना, आशा शिंदे, विद्या, दीपक हेमंत कुलकर्णी पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी लक्ष्मण येवलेकर, पल्लवी भावसार, नीलिमा कोडे, शिवाजीराव होळकर, अरविंद देसाई, प्रकाश वडनेरे, गंगापूर जेष्ठ नागरिक सचिव कैलास मोहिते, आप्पासाहेब पाटील, रामनाथ मोरे आदींसह मोठ्या संख्येने संस्थेचे सभासद उपस्थित होते. यावेळी नानासाहेब होळकर, उत्तम कडलग, अनिता भामरे, रवींद्र कुलकर्णी, विजय राऊत आदींची भाषणे झाली. प्रास्ताविकातून सविता चतुर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. धनंजय चतुर यांनी सूत्रसंचालन केले, तर वैशाली खैरे यांनी जमाखर्च, इतिवृत्ताचे वाचन केले तर प्रभाकर क्षीरसागर यांनी आभार मानलेत. राष्ट्रगीताने समारोप झाला.
