
ओझर: (वार्ताहर )संगणकीय युगात आपण स्पर्धा करणार असाल तर त्यासाठी त्याचे ज्ञान मिळवणे महत्त्वाचे आहे. ओझर येथील स्थानिक पातळीवर संगणक शिक्षणात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिजाऊ कॉम्प्युटर्स ॲण्ड नॉलेज इंस्टिट्युट या संस्थेला शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी भारतातील टॉप100 संगणक प्रशिक्षण संस्थांमध्ये स्थान मिळाले असून, संस्थेला “India’s Top 100 Institution” हा बहुमान देऊन सन्मानित करण्यात आला. हा मानाचा पुरस्कार २००४ मध्ये ‘फेमिना मिस इंडिया वर्ल्ड’ किताब जिंकलेली सिने अभिनेत्री सायली भगत तसेच AICPE, नागपूरचे डायरेक्टर शरद तावोरी व कविता तावोरी यांच्या हस्ते नागपूर येथे प्रदान करण्यात आला.ही निवड All India Council of Professional Excellence (AICPE), Nagpur यांच्या समितीने त्यांच्या सोबत कार्यरत असलेल्या ३३०० प्रशिक्षण संस्थांचे राष्ट्रीय स्तरावर विविध शैक्षणिक निकषांवर मूल्यांकन करून केली. संस्थेने संगणक साक्षरता तसेच डिप्लोमा व जॉब-ओरिएंटेड कोर्सेस जसे की, डीआयटी, डीओएम, डीएसए, डीओए, डीसीए, टॅली, स्पोकन इंग्लिश या क्षेत्रात अद्ययावत व दर्जेदार प्रशिक्षण दिल्यामुळे हा मानाचा बहुमान मिळाला आहे.या यशाबद्दल संस्थेचे संचालक तुषार मंडलिक संचालिका ज्योती मंडलिक व प्रशिक्षकांनी ओझर व पंचक्रोशीतील विद्यार्थी-पालकांचे आभार मानले असून, आगामी काळात अधिक नाविन्यपूर्ण व करिअर ओरिएंटेड कोर्सेस राबविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
