
नांदगाव (प्रतिनिधी ) नांदगाव- साकोरा रस्त्यावरील श्रीकृष्ण मंदिराजवळ सरफराज खान जब्बार खान उर्फ सरफराज पंखा व त्याचे दोन साथीदार पिक-अप वाहनातुन ७ गोवंश जनावरांना कत्तल करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती.त्यानुसार नांदगाव -साकोरा रस्त्यावर पोलिसांनी गोरक्षकांच्या मदतीने सापळा रचत पिक-अप वाहन क्र. (एम.एच.०६ बी.जी. २४०९) पकडले असता यात ७ गोवंश जनावरे निर्दयपणे बांधलेली आढळून आली. अंधाराचा फायदा घेत वाहन चालका सह तिघेजण फरार झाले. सरफराज खान, जब्बार खान उर्फ सरफराज पंखा यांचेसह तिघां विरुद्ध नांदगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून २ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उंबरठाण, सुरगाणा येथुन ही जनावरे कत्तली साठी मालेगावकडे नेण्यात येत असल्याची माहिती गोरक्षकांनी दिली. यातील जप्त गोवंश जातीच्या जनावरांची तपासणी करून व वैद्यकीय उपचार करून वेहळगाव येथील श्री गोवर्धन गो शाळेत रवाना करण्यात आले.
