
.
**सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०३२ वा दिवस* काही लोक इतरांपेक्षा नैसर्गिकपणेच जास्त धष्टपुष्ट असतील व ते त्यांच्यापेक्षा दुर्बल असलेल्यांना दडपू शकतील किंवा पराजित करू शकतील हे अगदी स्वयंसिद्ध सत्य आहे, पण या सामर्थ्याच्या साहाय्याने त्यांनी जीवनातील सगळे प्राप्य सुख केवळ स्वतःच उपभोगावे आणि इतरांना त्यापासून वंचित करावे हे मात्र योग्य नाही, आणि याविरुद्धच लढा चालू आहे. काही लोकांना, आपल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेमुळे इतरांहून जास्त पैसा मिळविता यावा हे अगदी साहजिक आहे, पण पैसा मिळविण्याच्या या नैसर्गिक क्षमतेमुळे अशा लोकांनी, ज्यांना पैसा मिळविता येत नाही त्यांच्यावर बेलाशक जुलूम करावा किंवा त्यांना चिरडून टाकावे हे मात्र अन्यायाचे आहे
*स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २७ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७
★ भाद्रपद वद्य /कृष्ण १२
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. १८ सप्टेंबर २०२५
★ गुरुपुष्यामृतयोग
★ द्वादशी श्राद्ध ★ २००२ साहित्यिक, मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचा स्मृतीदिन.
