
सिन्नर ( प्रतिनिधी ) प्रबोधनकार ठाकरे, पेरियार रामास्वामी व काॅम्रेड शरद पाटील यांच्या संयुक्त जयंती आलुतेदार बलुतेदार महासंघ, महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड वतीने साजरी करण्यात आली*

या कार्यक्रमाची सुरुवात प्रबोधनकार ठाकरे, पेरियार रामास्वामी व काॅम्रेड शरद पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की.प्रबोधनकार हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा आत्मचरित्र ही चरित्रे – अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली. त्यांची ’खरा ब्राह्मण’ आणि ’टाकलेले पोर’ ही दोन्ही नाटके समाजसुधारणांसाठी क्रांतिकारकच ठरली. खरा ब्राम्हण या नाटकाच्या प्रयोगाला परवानगी देऊ नये अशी मागणी पुण्यातील ब्राम्हणांनी न्यायालयाकडे केली असता, न्यायाधीशांनी प्रबोधनकारांच्या बाजूने निकाल दिला होता.अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुराणमतवद्यांशी लढा दिला मुळे त्यांच्या कार्यख्यातीमुळे ते राजर्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आले.

शाहू महाराज हे स्वतः सुधारणावादी व महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे ते प्रबोधनकारांचे चाहते झाले. त्यांनी प्रबोधनकारांची परीक्षाही घेतली व नंतर जाहीरपणे सांगितले की, लाच देऊन ज्याला वश करता येणार नाही किंवा विकत घेता येणार नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे, ती म्हणजे प्रबोधनकार होय. व *अनिल सरवार म्हणाले की पेरियार रामास्वामी* हे बुद्धिवाद , स्वाभिमान , महिला हक्क आणि जाती निर्मूलन या तत्त्वांना प्रोत्साहन दिले . त्यांनी दक्षिण भारतातील ब्राह्मणेतर द्रविड लोकांचे शोषण आणि उपेक्षितीकरण आणि त्यांना इंडो-आर्यन भारत मानणाऱ्या गोष्टी लादण्यास विरोध केला १९२४ मध्ये केरळमध्ये त्रावणकोर राजाने दलितांना मंदिरात प्रवेशबंदी केली होती. त्याविरोधात आंदोलन उभं राहिलं होतं. आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना राजाने अटक करून तुरुंगात टाकलं. आंदोलन पुढे चालवण्यासाठी सक्षम नेतृत्व आवश्यक होतं. त्यावेळी आंदोलनातील कार्यकर्त्यांनी पेरियार यांना नेतृत्व करण्याची विनंती केली.व आंदोलनात सहभागी होण्यासाठी पेरियार यांनी मद्रास काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं. गांधीजींच्या आज्ञेविरुद्ध जाऊन त्यांनी ही भूमिका स्वीकारली. राजाचा मित्र असल्यानं त्रावणकोरमध्ये त्यांचं भव्य स्वागत झालं. मात्र राजाच्या धोरणाविरोधातच होणाऱ्या आंदोलनाचं निमित्त असल्याने पेरियार यांनी त्रावणकोर संस्थानतर्फे होणारं स्वागत नाकारल.राजाच्या धोरणाविरुद्ध आंदोलनात सहभागी झाल्याने, मित्र असूनही त्यांना अटक करण्यात आली. अनेक महिने ते तुरुंगावासात होते. पेरियार यांच्या पत्नी नागम्मई यांनीही केरळमध्ये प्रचलित अस्पृश्येतविरोधात आवाज उठवला. २०२१ पासून, तामिळनाडू राज्य त्यांची जयंती ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरी करते तसेच *किरण कोथमिरे म्हणून की काॅम्रेड शरद पाटील* हे मुळात कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट) या पक्षाचे धुळे जिल्ह्याचे संघटक होते. शरद पाटलांना त्यांना स्त्री-पुरुष, म्हणजेच लिंगविषमतेच्या समस्येचीही जाणीव होऊन त्यांनी वर्ग आणि जाती यांच्या स्त्रीदास्यंताची चळवळही व्हायला हवी म्हणून त्यानी जातिभेद – स्त्रीदास्य हे संघर्ष – याला आव्हान देत भारतीय परिप्रेक्षात जातिव्यवस्था ही विषम उत्पादन संस्था असल्याचे त्यांनी पुढे आणले. यातून एकप्रवाही मार्क्सवादी अन्वेषण बहुप्रवाही बनले. क्रांतिकारी संघर्षात स्त्रीदास्यान्ताला प्राधान्य देऊन शरद पाटलांनी इ.स. १९७८साली, जातवर्गस्त्रीदास्यान्तक, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष या नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. या पक्षाची धोरणे कार्ल मार्क्स, जोतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसणीवर आधारित आहेत.अशी विचारसरणी असलेल्या शरद पाटलांना हे एक जातिमुक्त समाजासाठीच क्रांतिकारक पाऊल ठरले अशा महान महापुरुष विनम्र अभिवादन*या कार्यक्रमाचे सुञसंचलन भाऊसाहेब पवार यांनी केले व प्रास्ताविक विजय मुठे तर आभार रविंद्र गिरी यांनी मानले* याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे ,अनिल सरवार,आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे,किरण कोथमिरे, किरण जाधव, रविंद्र गिरी, भाऊसाहेब पवार, विनोद शितोळे,सुनिल सावंत, रोहित मुठे, लखन पाचोरे बाळासाहेब सदगीर, कैलास झगडे, हेमंत देवनपल्ली, अशोक सोनवणे,दिपक सुडके आदि उपस्थित होते
