
मनमाड ( प्रतिनिधी ) संत बार्णबा प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यालयात लोकशाही पद्धतीने विद्यार्थी प्रतिनिधी ची निवडणूक पार पडली.इयत्ता 5 वी ते इयत्ता 7 वी पर्यंतच्या इच्छुक विद्यार्थी उमेदवार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते निकाल लागेपर्यंत ची सर्व माहिती प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणारे मा.श्री.आहिरे सर यांनी दिली. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कराड सर यांनी काम पाहिले.सर्व उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांनी आपल्या चिन्हाचा प्रचार सुद्धा केला.सर्व 21 उमेदवार होते त्यापैकी 10 उमेदवारांनी माघार घेतली.एकूण 11 उमेदवार रिंगणात होते. इयत्ता 5 ते 7 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी मतदारांनी आपले बहुमोल असे मतदान केले. सर्व शिक्षकांनी सुद्धा आपले अनमोल असे मत विद्यार्थी उमेदवाराला दिले. विद्यार्थी सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल दुसऱ्या दिवशी जाहीर करण्यात आला.यामध्ये सर्वाधिक मते इ. 6 वी तु अ ची विद्यार्थिनी अनुष्का प्रशिक पठारे द्वितीय क्रमांकाची मते इ.7 वी चा विद्यार्थी केतन जाधव यास मिळाली.दोघांची अनुक्रमे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली.विजयी उमेदवारांचे प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आहिरे सर तसेच माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कराड सर यांनी अभिनंदन केले.यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका सौ.अहिरे मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.मनोरम सदन शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ.कवडे मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी कर्मचारी म्हणून श्री.शेल्टे सर, श्री.कवडे सर,श्री कावरे सर,श्री.पगार सर, श्री.माने सर यांनी काम पाहिले.
