
नांदगाव – मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, तालुका रुग्णालय, नांदगाव यांच्या मार्फत एड्स प्रतिबंध व नियंत्रण शिबिर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका ज्योती काळे होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजेंद्र माताडे यांनी केले. तालुका रुग्णालयाचे डॉ.काजल साळूंके यांनी विद्यार्थ्यांना एड्स हा आजार का होतो , ह्या आजाराने आपली शारीरिक हानी कशी होते हे समजून सांगितले. दिपक जाधव, ओम गरुड व मयूर निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एड्स प्रतिबंध उपाय समजून सांगितले. तसेच एड्स हा आजार स्पर्श केल्याने होते नाही हे समजून दिले. याप्रसंगी उपमुख्याध्यापक दीपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे उपस्थित होते. आभार प्रदर्शन सुनील सुपेकर यांनी केले.
