
नाशिक:- ( प्रतिनिधी )नाशिक जिल्ह्यातील भगूरचे सुपुत्र आणि मुंबई येथील गुन्हे शाखेतील सहायक पोलिस आयुक्त शामराव शिंदे यांचा मानाचा ‘राष्ट्रपती पुरस्कार’ मिळाल्याबद्दल सजग नागरिक संघ आणि साहित्यिक मित्र परिवाराच्या वतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालयभूषण मु.शं.औरंगाबादकर सभागृहात नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक वाचनालयाचे कार्याध्यक्ष संजय करंजकर, सहाय्यक सचिव प्रा.सोमनाथ मुठाळ, नाट्यगृह सचिव गणेश बर्वे, परिवहन अधिकारी उत्तमराव जाधव, ज्येष्ठ कामगार नेते प्रशांत कापसे, ज्येष्ठ उद्योजक अविनाश कातकाडे, सुप्रसिद्ध विनोदी साहित्यिक संदीप देशपांडे, कवी रवींद्र मालुंजकर आणि सर्व क्षेत्रांतील साहित्यिक मित्रपरिवाराने केले आहे.
