
नांदगाव (प्रतिनिधी)आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त, दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत “स्वच्छता पंधरवडा” संपूर्ण राज्यात साजरा केला जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत सर्व शासकीय व खाजगी आय.टी.आय. संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रातील एक गाव निवडून तेथे स्वच्छता अभियान राबवावे याबाबतचे शासनाकडून परिपत्रक विभागास प्राप्त झाले होते.
त्या अनुषंगाने नांदगाव तालुक्यातील पोखरी या गावी औद्योगिक प्रशिक्षण संस्था , नांदगाव यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर स्वच्छता अभियानाची सुरुवात पोखरी गावचे नवतरुण सरपंच मा. श्री.ॶॅड.किरणराव गायकवाड, तसेच उपसरपंच सौ.देवरे ग्रामविकास अधिकारी श्री. सतिष शिंदे साहेब संस्थेचे गटनदेशक श्री. निकुंभ सर व ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामस्वच्छता व वृक्षारोपण आदी उपक्रम यानिमित्त राबविण्यात आले.
यानिमित्त पोखरी गावचे सरपंच किरणराव गायकवाड यांच्यातर्फे प्रशिक्षणार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप देखील करण्यात आले.
या स्वच्छता अभियानात संस्थेचे सर्व कर्मचारी,ग्रामस्थ, प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षणार्थीनी सहभागी झाले होते.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावचे सेवानिवृत्त मेजर राजेंद्र पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
याबाबत त्यांचे संस्थेचे गट निदेशक व सरपंच यांनी विशेष आभार मानले.
