
.एम्स चॅरिटेबल ट्रस्ट व मिन्हाज मिर्जा यांच्या तर्फे 21000/- मदतनिधी म्हणून देण्यात आले.
नासिककर.( प्रतिनिधी).मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी साडे नऊ वाजता संविधान प्रेमी नासिककर , एम्स चैरिटेबल ट्रस्ट , अलमाइटी फाउंडेशन, महाराष्ट्र अंनिस, महामित्र परिवार व समविचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह गुरुद्वारा येथे शीख समुदायाशी चर्चा करताना अजमल खान म्हणाले, संपूर्ण भारत देश एक आहे आणि एका भारतीयाचे दुःख हे सर्व भारतीयांचे दुःख आहे. आम्ही आमच्या पंजाबच्या मदतीसाठी सदैव तयार आहोत.कॉम्रेड राजू देसले म्हणाले संविधान प्रेमी नाशिककर व सर्व संविधान प्रेमी या कठीण परिस्थितीत आमच्या सोबत ठामपणे उभे आहेत. आम्ही सर्व भारतीय पंजाब करीता एकमताने ठाम उभे आहोत. यावेळी मिन्हाज मिर्जा, मुकुंद दीक्षित वासंती दीक्षित, एडव्होकेट प्रभाकर वायचळे , कॅप्टन कुणाल गायकवाड, सलीम खान, जावेद शेख , हसरत शेख , अय्युब शेख , सैय्यद महबूब अली, सलीम दातार, दत्ता वायचळे, अब्दुल्ला भगुरकर ,हरिश चंद्र अंबादास सावंत , सुनील पवार, हर्षाली यांसह शीख बांधव संख्येने उपस्थित होते. कुलवंत बग्गा, गुजराल साहेब व इतर शीख समुदायाने सगळ्यांचा आभार मानले .एम्स चॅरिटेबल ट्रस्ट व मिन्हाज मिर्जा यांच्या तर्फे 21000/- मदतनिधी म्हणून देण्यात आले.
