
नाशिक (बातमीदार) दिनांक १७- हिंदी माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या हिंदी भाषिक विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रज मराठी विचार मंच आयोजित ‘मराठीचे उपासक’ ही पदवी लेखी परीक्षा घेऊन मिळविली हे अभिमानास्पद आहे त्याबद्दल मंचचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. असे गौरवोद्गार विश्वस्त लक्ष्मण जायभावे यांनी काढले ते कै.व्ही.एन.नाईक शिक्षण प्रसारक संस्थेच्या विविध शाळांमधील सुमारे पंधराशे विद्यार्थ्यांना मराठीचे उपासक ही पदवी देवून सन्मानित करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेसाठी काम करणारी कुसुमाग्रज मराठी विचार मंच ही संस्था मराठी भाषेविषयी बालपणापासूनच आवड निर्माण व्हावी आणि सोशल मिडियाच्या विविध साधनांमुळे वाचनाची गोडी कमी होत असल्याने वाचन संस्कृती वाढावी म्हणून खास तयार केलेल्या पुस्तकाच्या अभ्यासाद्वारे शालेय विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेत आहे. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मराठीचे उपासक ही पदवी देऊन सन्मानित करण्यात येते, असे मराठीचे उपासक तयार करण्याचे काम संस्था करीत असून गेल्या शैक्षणिक वर्षापासून जवळपास पंधरा हजार विद्यार्थ्यांना मराठीचे उपासक ही पदवी मंचाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये सुमारे तीन लाख मराठीचे उपासक तयार करण्याचे काम केले जाणार आहे. हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,सिडको नाशिक या विद्यालयाचे ५०० विद्यार्थी बसलेले होते. विशेष म्हणजे संबंधित विद्यालय पूर्णपणे हिंदी भाषिक व हिंदी माध्यम असतानाही या विद्यार्थ्यांनी हे यश मिळविले आहे. विजेते पुढील (गट सातवी आठवी) प्रथम कु.आनिस अरविंद पासवान द्वितीय कु.आकांक्षी मुकेश कनोजिया तृतीय कु.प्राची सुभाष सैनी (गट चौथी ते सहावी)प्रथम कु.पायल सतीश मिश्राद्वितीय कु.संगीता सुनील गुप्तातृतीय कु.आदिती चंदन सिंहमाध्यमिक विद्यामंदिर एकलहरे, नाशिक (सातवी आठवी गट) प्रथम कु.राधिका हेमंत पवार,द्वितीय कु.अनुष्का शिवाजी जगताप तृतीय कू.स्वरांजली भैय्यासाहेब चव्हाण (चौथी ते सहावी गट) प्रथम कू .गौरव संतोष वाणी,द्वितीय कु.कृतिका हर्षद गजभिये,तृतीय कु.रिया भरत अस्वले, माध्यमिक विद्यामंदिर ढकांबे,ता. दिंडोरी(गट सातवी आठवी)प्रथम कू.अनुष्का अशोक काकड,द्वितीय कू.वैष्णवी अण्णासाहेब बोणंगेया परिक्षेसाठी प्रधानाचार्य अलगटसर, विकेसर,पर्यवेक्षक यादवसर तसेच रेखा धात्रक, एस के आव्हाड, मधुकर वाघ, श्रीमती साधना कातकडे, बोडके सर, मुख्याध्यापक अनिल ताडगे, उगलेसर आणि श्रीमती लता लोखंडे यांनी मेहनत घेतली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक रमेश वाघ, उद्योजक सुनिल बागुल, बाबाज् थिएटरचे प्रशांत जुन्नरे यांच्यासह मंचाचे अध्यक्ष सतीश बोरा, उपाध्यक्ष दिलीप बारवकर, सरचिटणीस सुभाष सबनीस हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष सबनीस यांनी केले तर सुत्रसंचालक रेखा धात्रक यांनी केले.
