
नांदगाव (प्रतिनिधी ) न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव शाळेचे स्कूल कमिटी अध्यक्ष श्री. व्ही वाय काकळीज सर तसेच श्रीमती विद्याताई आहेर मॅडम यांनी आपल्या शाळेला संगीत साहित्य भेट देऊन आमच्या सांस्कृतिक जडणघडणीस हातभार लावले. त्याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते.संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही,

तर विद्यार्थ्यांच्या मनोविकासासाठी एक प्रभावी माध्यम आहे. आपल्यामुळे शाळेत संगीताचा प्रसार अधिक व्यापक प्रमाणात होईल व विद्यार्थ्यांना गुणांची जोपासना करण्याची संधी मिळेल. या उदार योगदानामुळे शालेय वातावरण अधिक समृद्ध व प्रेरणादायी होईल.

संगीत ही आत्म्याला स्पर्श करणारी कला आहे. आपण दिलेल्या अनमोल भेटीमुळे आमच्या विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणाची नवी दिशा मिळेल, त्यांची कला खुलून येईल व शाळेच्या सांस्कृतिक परंपरेला अधिक बळकटी मिळेल.आपल्या या उदार कृतीबद्दल शाळेच्या वतीने पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार!”
