
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८५२ वा दिवस* जेव्हा या देशातले विशाल ह्रदयाच्या हजारो स्त्रिया व पुरुष त्यांच्या विलासी जीवनाचा, सार्या इच्छांचा त्याग करून विनाशी आणि अज्ञानाच्या गर्तेत खोल-खोल बुडत चाललेल्या त्यांच्या देशबांधवांच्या कल्याणासाठी अतिशय प्रेमाने आपुलकीने काम करण्यास पुढे येतील, तेव्हा हा देश जागा होईल. माझ्या या क्षुल्लक आयुष्यात मी असा अनुभव घेतला आहे की चांगला उदात्त हेतू, गांभीर्य प्रामाणिकपणा आणि अमर्याद प्रेम यांच्या सहाय्याने जगाला जिंकता येते. या गुणांनी भरलेला एक माणूस देखील लाखो ढोंगी लोक आणि दृष्टांचा काळ्या कारवाया ध्वस्त करू शकतो. स्वामी विवेकानंद…
आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो भारतीय सौर ३० फाल्गुन शके १९४६*
★ फाल्गुन वद्य /कृष्ण ७
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ शुक्रवार दि. २१ मार्च २०२५ ★ १८८७ क्रांतिकारक व भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचे संस्थापक मानवेंद्रनाथ रॉय यांचा जन्मदिन
★ १९२३ सहज योग च्या संस्थापिका आणि अध्यात्म गुरु निर्मला श्रीवास्तव यांचा जन्मदिन.
★ जागतिक वनदिन
★ जागतिक कविता दिन
★ आंतरराष्ट्रीय रंग दिन
★ जागतिक कटपुतली दिन
★ आंतरराष्ट्रीय वंशभेद निर्मूलन दिन.


