
निगडोळ:-(प्रतिनिधी ) रयत शिक्षण संस्थेचे मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक या विद्यालयात थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ आण्णांच्या जयंती महोत्सव सप्ताहचे औचित्य साधून विद्यालयाचे मा.मुख्याध्यापक बोरसे डी.डी.यांच्या मार्गदर्शनानुसार जेष्ठ शिक्षक एन.जे. कापडणीस व श्रीमती.गायकवाड पी.व्ही.यांनी वक्तृत्व,निबंध,मेहंदी व चित्रकला स्पर्धांचे नियोजन केले इ.८वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्फुर्तपणे भाग घेतला.जेष्ठ शिक्षक एस.व्ही.बेद्रे व ए.बी.वाघमारे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.मा.मुख्याध्यापक बोरसे डी.डी.यांनी प्रथम,द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले. स्पर्धा उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी देवरे व्ही.ए व भामरे टी.व्ही.यांनी अनमोल सहकार्य केले.
