
लेखन:–करपे पी.आर.(पर्यवेक्षक –लो.शं.बा.वाजे.वि.सिन्नर.)९८२२८१३१७५
सिन्नर प्रतिनिधी (सोमनाथ गिरी):-यासकडून*
जगाची वाढलेली लोकसंख्या, त्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेले अनेक प्रश्न त्यात हवामान, पर्यावरण आणि आरोग्य यावर झालेला विपरीत परिणाम. प्रदूषणामध्ये झालेली मोठी वाढ त्याचा परिणाम म्हणजे ओझोन सारख्या वायूच्या थराला पडलेली छिद्रे भविष्यात जीवसृष्टीसाठी अनेक संकटे निर्माण करू शकतात.१९७० च्या उत्तरार्धात ओझोनच्या थराला छिद्र असल्याचा दावा शास्त्रज्ञाने केला होता. यानंतर ८० च्या शतकात जगभरातील अनेक देशांनी या समस्येवर विचार करण्यास सुरुवात केली. १९८५ मध्ये ओझोन थराच्या संरक्षणासाठी व्हीएन्ना अधिवेशन बोलावण्यात आले, यानंतर १९ डिसेंबर १९९४ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने १६ सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या जागतिक ओझोन दिवस १९९५ मध्ये साजरा करण्यात आला. ओझोनचा थर हा ऑक्सिजनच्या तीन अणुचा समावेश असलेला वायू आहे आणि तो पृथ्वीच्या वातावरणाचा एक थर आहे, जो सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणापासून आपले संरक्षण करण्याचे काम करतो. फ्रेंच भौतिक- शास्त्रज्ञ फॅब्री चार्लस आणि हेन्री भूषण यांनी १९१३ मध्ये या ओझोन वायू थराचा शोध लावला होता. ‘ओझोन ‘ हा ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ हुंगणे असा आहे . ओझोन मध्ये एक विशेष प्रकारचा वास आहे. हवेमध्ये ओझोनचे एकूण प्रमाण अत्यल्प आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून १६ किमी या उंचीवर सूर्याचे किरण ऑक्सिजनचे रूपांतर ओझोन वायू मध्ये करतात. या उंचीपासून २३ किलोमीटर पर्यंत ओझोनचे प्रमाण वाढत जातो आणि त्या ठिकाणी ओझोनचा थर सर्वाधिक जाड थर असतो. ओझोन हा फिकट निळ्या रंगाचा वायू असून पाण्यात थोड्या प्रमाणावर विरघळतो त्याला क्लोरीन वायू सारखा वास असतो. ओझोन सूर्यापासून येणाऱ्या प्रारणातील अपायकारक अतिनिल किरण हा ओझोन वायू थर शोषून घेतो आणि पृथ्वीवरील पृथ्वीवर पोहोचण्यापासून अतिनील किरणांना थोपवतो. विकसित देशांमध्ये वातविलेप तुषार हे प्राणोदक घातक आहे तसेच परफ्युम सारख्या प्रणोदकापासून फ्लोरोकार्बन, क्लोरोफ्लोरोकार्बन, ट्राय क्लोरोफ्लोरोप मिथेन, कार्बन टेट्राक्लोराइड, नायट्रिक ऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, हायड्राझायल, क्लोरीन, ब्रोमीन वर उल्लेख केलेले सर्व वायू यातून ओझोन वायूचा थर कमी करण्यास कारणीभूत ठरलेले आहेत. ओझोन वायूचा थर कमी झाल्यामुळे अतिनील किरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात ऑस्ट्रेलियाच्या परिसरात ओझोन वायूचा काही थर नष्ट झाल्यामुळे अतिनील किरण थेट पृथ्वीवर येत आहेत त्यामुळे त्या ठिकाणी त्वचेच्या रोगात वाढत होतं आहे .अतिनील किरणाचा परिणाम त्वचेचे कर्करोग, गुणसूत्रात होणारा बदल यासारखे गंभीर आजार निर्माण करू शकतात.दर दशकाला ओझोनचा थर ४ टक्क्याने कमी होत आहे असे तज्ञांचे मत आहे. अतिनील किरणाचा प्रभाव केवळ प्राण्यांवरच होतो असं नाही तर वनस्पतीवरही याचा व्यापक स्वरूपात विपरीत परिणाम होत आहे. काही महत्त्वाची पिके जसे गहू, मका आणि सोयाबीन या किरणांनी खूप प्रभावित होतात. एका मोठ्या अनुमानानुसार ओझोन मध्ये १ टक्का -हास होण्याने पिकाच्या उत्पादनात १ ते २ टक्के घट होते. वर उल्लेख केलेले दुष्परिणाम आजच्या स्थितीला कमी वाटेल तरीही भविष्यात फार मोठा धोका उद्भवू शकतो. ओझोन वायूचा थर कमी होऊन धोके निर्माण होऊ नयेत. म्हणून यावर उपाययोजना सांगताना पर्यावरण नियंत्रणाची स्वतःची संशोधन पद्धती विकसित करण्याच्या हालचाली पाश्चात्य देशात जोराने वाढल्या आहेत. ही पद्धत खर्चिक असल्यामुळे विकसनशील देशाला परवडणारी नाही. *ओझोन वायूचा थर नष्ट होऊ काही उपाय*.१) ओझोन वायूच्या थराला नुकसान होऊ नये म्हणून वर उल्लेख केलेल्या रासायनिक घटकाचा कमीत कमी वापर पर्यावरणातील अनेक गोष्टीचा पुनर्वापर करणे आणि पुन्हा उपयोगात आणणे.२)ओझोन वायूला हानिकारक ठरणाऱ्या वायूचे प्रदूषण कसे कमी करता येईल याची काळजी घेणे ३) हरित ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल याची काळजी घेणे त्यामध्ये सोलार पॅनल वाऱ्यापासून वीज निर्मिती पाण्यापासून वीजनिर्मिती याचा वापर मोठ्या प्रमाणावर केल्यास ओझोन वायू सुरक्षित राहू शकतो.४) जास्तीत जास्त झाडे लावून, त्याची वाढ करून हरित पट्टे तयार केल्यास निश्चितच ओझोन वायू चा थर सुरक्षित राहू शकतो. यासाठी सामाजिक संस्था, संघटना, शाळा व महाविद्यालय यासारख्या अनेक स्तरातून ओझोन संरक्षण चळवळ उभी राहिली पाहिजे. तर ओझोन वायूचे संरक्षण होऊ शकते.लेखन:–करपे पी.आर.(पर्यवेक्षक –लो.शं.बा.वाजे.वि.सिन्नर.)९८२२८१३१७५
