
.ओझर. (प्रतिनिधी): दि.१६ वार्ताहर के.सी.महिंद्रा एज्युकेशन ट्रस्ट नाशिक आणि नांदी फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मविप्र संचलित माधवराव बोरस्ते विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. याप्रसंगी तुफान खेळाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यात विद्यार्थिनींसाठी फुटबॉल, शटल कॉक, खो-खो, रिंगटेनिस आदी खेळांच्या स्पर्धा संपन्न झाल्या. क्रीडा शिक्षक प्रभाकर लवांड उज्वला जाधव मनोरमा सोमवंशी यांनी पंच म्हणून काम पाहिले. याप्रसंगी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे ज्येष्ठ शिक्षक विशाल पगारे मोहन क्षीरसागर उपस्थित होते.या खेळाचे संयोजन नांदी फाउंडेशनच्या समन्वयक शिक्षिका माधुरी चौधरी श्रद्धा पगारे यांनी केले.
