
नांदगाव ( प्रतिनिधी ) नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते ऑल इंडिया संविधान आर्मीचे नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुक्ताराम बागुल यांनी सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आले. मात्र या लेखी आश्वासनाला केराची टोपली दाखविली असल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते ऑल इंडिया संविधान आर्मी चे नाशिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मुक्ताराम बागुल यांनी आपल्या मागण्यासाठी दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी पासून बेमुदत संप मागे अमर उपोषण सुरू केले होते. नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी उपोषण स्थळी भेट देऊन लेखी आश्वासन दिले होते. परंतु या लेखी आश्वासनाला पायमल्ली देऊन गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी केराची टोपली दाखवली असल्याची बाप समोर आली आहे. नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी घरकुल विभागाचे संजय असाल यांच्यावर कारवाई करण्याचे पत्र दिले होते. तसेच शिवा रस्त्याबाबत सात दिवसाच्या चौकशी समिती नेमून त्यांचा अहवाल आल्यानंतर संबंधितावर कारवाई करण्यात येईल असे देखील लेखी आदेश दिले होते. परंतु अद्याप पर्यंत चौकशी समिती नेमण्यात आल्याचे दिसून येत नाही. तर घरकुल विभागातील अधिकाऱ्यावर देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यासाठी सुरुवात केल्याचे दिसून येत नाही. याचाच अर्थ गटविकास अधिकारी हे देखील या भ्रष्टाचारात मिली बघत आहे की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत अधिकारी आर एम मगर यांना नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी अपात्र घरकुल लाभार्थ्यांचे मालमत्तेवर बोजा सोडविण्यासाठी दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी पत्र दिले होते. या पत्रात अपात्र लाभार्थ्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवून दोन दिवसाच्या आत अहवाल पाठविण्यात यावा असे पत्रात म्हटले आहे परंतु त्यांनी देखील आज आठ दिवस झाले असून या आदेशाचे उल्लंघन करून पायमल्ली केली आहे. ग्रामपंचायत अधिकारी आर एम मगर यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथील पुतळ्याजवळ पावसाचे पाणी तुंबू नये म्हणून पूर्वी अतिक्रमण काढलेल्या नालीचा मुरूम काढून सपाटीकरण करून पूर्वीच्या नालीच्या ठिकाणीच नाली करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर विश्वास ठेवून सदर कामाला सुरुवात केली. मात्र ग्रामपंचायत कर्मचारी याने काही अतिक्रमणाचे असलेला मुरूम उतरून सापटीकरण केले. तर काही मुरू म तसाच ठेवला. आणि पूर्वी काढलेले नालीवर नालीचे खोदकाम न करता ग्रामपंचायत हद्दीत सभास मंदिर व सभा मंडप च्या बाजूला नवीन नालीचे खोदकाम केले. म्हणजेच सदर ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायतीचा योग्य तो खर्च न करता विनाकारण खर्च करत असल्याचे सिद्ध होत आहे. तरी ग्रामपंचायत अधिकारी यांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी त्यांना पाठीशी घालू नये. व स्वतः लक्ष घालून काम करावे असे मुक्ताराम मागू यांनी बोलताना म्हटले असून आपल्या मागण्यासाठी मुक्ताराम बागुल हे पुन्हा उपोषण करणार असल्याची माहिती पुढे बोलताना सांगितली.
