
डुबेरे (प्रतिनिधी ) डुबेरे केंद्रातील गुणवंत शिक्षकांचा दिमाखदार सन्मान सोहळाशिक्षक दिनाच्या औचित्याने डुबेरे केंद्रातील ज्या कर्तृत्ववान शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला त्या प्रेरणादायी शिक्षकांचा सन्मान सोहळा नुकताच मनेगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला ज्ञान, संस्कार आणि कर्तृत्वाचा सोहळा असेच म्हटले पाहिजे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डुबेरे केंद्राचे केंद्रप्रमुख विजय निरगुडे यांनी भूषविले. तर प्रमुख पाहुणे म्हणून नुतन जवाहर विद्यालय मनेगावच्या मुख्याध्यापिका सौ. हांडगे, ललित सोनवणे (मनेगाव), रविंद्र सोनवणे (डुबेरे), वसंत गोसावी (पाटोळे), सुधाकर अहिरे (वडगाव सिन्नर) या मुख्याध्यापकांची उपस्थिती लाभली. सन्मानित शिक्षक व त्यांचे पुरस्कार सौ. छाया शेवाळे, आटकवडे – (रोटरी क्लब ऑफ सिन्नर पुरस्कार)श्री. समाधान मते, डुबेरेवाडी – (दर्पण फाउंडेशन पुरस्कार)श्री. अशोक पांगारकर, मनेगाव – (लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी पुरस्कार)श्री. अंकुश सहाणे, मनेगाव – (आदिवासी युवा फाउंडेशन पुरस्कार)सौ. स्वाती खताळे, डुबेरे – (अहिल्यादेवी होळकर पुरस्कार)सौ. चंद्रकला हिरे व सौ. संगिता जगताप, आश्रमशाळा पाटोळे – (सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघ पुरस्कार)या सत्काराने डुबेरे केंद्रातील शिक्षकांच्या कार्याचा गौरव तर झाला, शिवाय इतर शिक्षकांना नवीन प्रेरणा मिळाली. संपूर्ण सोहळा उत्साहवर्धक वातावरणात पार पडला. उपस्थित शिक्षक, मान्यवर व विद्यार्थ्यांनी सत्कारार्थींचे मनःपूर्वक अभिनंदन करत टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
