
लोहोणेर येथील जनता विद्यालयात हिंदी दिनानिमित्त हिंदी साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करताना मुख्याध्यापिका के.ए.शिंदे, उपमुख्याध्यापक एन.आर.ठाकरे,पर्यवेक्षक व्ही.एम. निकम समवेत उपस्थित शिक्षकवृंद. (छाया – सुनिल एखंडे)*
लोहोणेर-:( प्रतिनिधी )मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात राष्ट्रभाषा हिंदी दिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका के.ए.शिंदे होत्या तर उपमुख्याध्यापक एन.आर.ठाकरे, पर्यवेक्षक व्ही.एम.निकम तसेच हिंदी विषय शिक्षक सलीम शहा,रोहित पाटील, महेंद्र बच्छाव, अलका सूर्यवंशी,श्रद्धा शेवाळे,प्रतिमा निकम आदी व्यासपीठावर उपस्थित होते.हिंदीचे ज्येष्ठ साहित्यिक मुन्शी प्रेमचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.यावेळी हिंदी विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा विद्यालयाच्या वतीने पेन व गुलाब देऊन सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांनी गीतगायन, काव्यवाचन, वक्तृत्व, शब्दकोडी अशा विविध उपक्रमांतून हिंदी दिनाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.शिक्षक एस.एम. शहा यांनी हिंदी दिवस साजरा करण्यामागील पार्श्वभूमी सांगत भाषेचे महत्त्व विशद केले.अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापिका के.ए.शिंदे म्हणाल्या की हिंदी ही केवळ राष्ट्रभाषाच नाही तर आपल्या देशाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. विविध भाषा,बोली,प्रांत यामध्ये हिंदी आपल्याला जोडणारे सेतू आहे. विद्यार्थ्यांनी हिंदीचा अभ्यास केवळ विषय म्हणून न करता तिचे व्यावहारिक ज्ञान आत्मसात केले पाहिजे. आजच्या जागतिकीकरणाच्या युगात इंग्रजीचे महत्त्व मान्य आहे; पण आपल्या संस्कृतीशी जोडणारी आणि भारताच्या जनमानसात रुजलेली भाषा हिंदीच आहे. म्हणून प्रत्येकाने हिंदीचा सन्मान करणे आणि तिचा वापर वाढवणे हे आपले कर्तव्य आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थिनी रुचिका शिरोडे व रोशनी निकम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे नियोजन हिंदी समितीच्या वतीने करण्यात आले.
