

*सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०२५ वा दिवस* लक्षावधी भारतीय नरनारी ज्या स्तोत्राचा प्रतिदिन पाठ करतात ते रुचीनां वैचित्र्यादृजुकुटिल नानापथजुषां**नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव।।७।।* “भिन्नभिन्न उगमापासून निघणारे विभिन्न जलप्रवाह ज्याप्रमाणे अंती सागरास मिळून एक होऊन जातात त्याचप्रमाणे रुचीनां वैचित्र्यानुसार वेगवेगळ्या सरळ वा वक्र मार्गांनी जाणारे सर्व प्रथिक प्रभो, अंती तुलाच येऊन मिळतात. गीतेत भगवान श्रीकृष्ण उद्घोषित करतात, *ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।**मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥११॥ अध्याय-४.* कुणी कोणत्याही भावाचा आश्रय घेऊन मजप्रत येईना का मी त्याच भावाने त्यावर अनुग्रह करीत असतो. अर्जुना लोक चौखाळीत असलेले निरनिराळे मार्ग अखेरीस मलाच येऊन मिळतात. आजची ही अपूर्व, महिमाशाली सर्वधर्मपरिषद वरील उदात सत्य अवघ्या जगासमोर जाहीरपणे प्रस्थापित करीत आहे. *स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर २० भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७*
★ भाद्रपद वद्य /कृष्ण ४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. ११ सप्टेंबर २०२५
★ भरणी श्राद्ध
★ १८९५ भूदान चळवळीचे प्रणेते, पहिले वैयक्तिक सत्याग्रही, भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांचा जन्मदिन.
★ ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील “शिकागो” येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेतील विश्ववंद्य स्वामी विवेकानंदांच्या विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या क्रांतीकारी व्याख्यानास १३२ वर्ष पूर्ण होत आहेत.
★ विश्वबंधुत्व दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
