
सिन्नर ( प्रतिनिधी )सिन्नर शहरातील तहसील कार्यालया समोरील क्रांतिस्थळावरील आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे व आद्य क्रांतिकारक भागोजी नाईक ह्या महापुरुषांच्या त्रिशिल्प स्थळी म.रा.रामोशी महासंघ, आलुतेदार बलुतेदार महासंघ महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर येथिल मोठ्या उत्साहात क्रातीवीर उमाजी राजे नाईक यांची जयंती सजारी झाली* आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांच्या २३४ वी जयंतीनिमित्त निमित्ताने यांच्या त्रिशिल्पाला पुष्पहार आर्पण करण्यात आले.*

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की* भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या विरोधाब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडणारे महान आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा त्यांच्या संघर्षमय जीवन कार्याचा भारताच्या इतिहासात अनेक गोष्टी अनैतिहासीक आहेत म्हणूनच उच्च वर्णीय इतिहासकारांनी सन १८५७ च्या उठावाला अधिक महत्व दिले. परंतु भारताचा इतिहासात खोलवर डोकावून पाहिले तर असे लक्षात येईल की, १८५७ च्या उठावाच्या आधीही काही उठाव झाले आहेत. त्यातील एक उठाव म्हणजे १८२१ चा उठाव. मात्र तथागथीत इतिहासकारांनी जाणून बुजून ह्या उठावा बाबत लिहिणे टाळले कदाचित ते लिहिले गेले असते तर उपेक्षित बहुजन समाजातील उमाजी नाईक हा क्रांतिवीर बहुजन समाजाला समजला गेला असता. मात्र इतिहास कोणाच्या लेखणीने पुसला जात नाही, सुर्याच्या प्रकाशा इतके ते चमकत असते.असे म्हणालेउमाजी नाईक यांच्या जीवन संघर्षच्या खाणाखुणा ही माती आजही त्याची साक्ष देत आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी वारसा पुढे चालवला रामोशी समाजातील थोर क्रांतिकार भारतामध्ये स्वातंत्र्यलढ्यात सर्वप्रथम इंग्रज विरुद्ध बंड पुकारला ते महाराष्ट्रातील बहुजन समाजाचा थोर आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक, तंट्या भिल्ल, राघोजी भांगरे आणि बिहार मधील आदिवासी नायक बिरसा मुंडा यांनी त्यापैकी महत्त्वाची कामगिरी बजावली ती महाराष्ट्रातील रामोशी समाजातील नरवीर उमाजी नाईक होते*युवा नेता उदयभाऊ सांगळे* यांनी आपल्या मनोगत व्यक्त करता त्यांनी आद्यक्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांनी पारतंत्र्याची होळी करून इंग्रजी सत्तेच्या विरोधात बंड पुकारून गोऱ्या माकडांना चालते व्हा,

अशी सर्वप्रथम डरकाळी फोडणाऱ्या या महान क्रांतिकारी उमाजी नाईक यांच्या जीवन कार्याचा व धाडसी पराक्रमांचा सध्याच्या इतिहासकारांना व सरकारला विसर पडला आहे.असे म्हणालेदेशाचा प्रत्येक भाग त्यांनी काबीज केला होता. इंग्रजांची राजवट दिवसेंदिवस वाढत चालली होती. इंग्रजांच्या राजवटीमुळे सर्व संस्थाने व राजेशाही भयभीत झाली होती. त्याचवेळी इंग्रज सरकारच्या मुळावर घाव घालण्याचा निर्धार उमाजीने केला होता. इंग्रज अधिकाऱ्यांना त्रास देत, मोठे सावकार, व्यापारी अशा लोकांना लुटायला आणि गोर गरीब. जनतेला मदत करत असे अनिल सरवार यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतानी त्यांचा क्रांती बंडात सामील असलेले इतर समाजातील लोकना सोबत घेऊन उमाजी राजे नाईक यांनी रामोशी, महार, मांग, महादेव कोळी, भिल्ल आदिवासी आदी सवंगडी घेऊन टोळी बनवली. प्रथम पुण्यातील भांबुर्डे येथील इंग्रजांचा खजिना लुटला.देशाच्या स्वातंत्र्य युद्धात व अन्याय आत्याचारा विरुद्धच्या लढ्यात आद्य.क्रांतिकारक उमाजी राजे नाईक यांचे खूप मोठे योगदान होते अशा क्रांतिकारकास विनम्र अभिवादन.. ,*या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सरवार यांनी केले व प्रास्थाविक नामदेव मचकुले यांनी केले तर आभार विजय मुठे यांनी मानले*. मा.नगराध्यक्ष विठ्ठल उगले डाॅ.विण्षु आंत्रे दत्ता गोळेसर, मनोज महात्मे,भाऊसाहेब ठाकरे, कैलास झगडे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष रामु इदे,किरण कोथमीरे सरपंच डूबेरवाडी दत्तु गोफणे ,दिपक सुडके, विनोद शितोळे व जगन्नाथ कटारनवरे यांना आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास जि.परिषद सदस्य सिंमीतीनी कोकाटे, युवा नेते उदयभाऊ सांगळे महामित्र दत्ता वायचळे, मा.नगराध्यक्ष विठ्ठल उगले, डाॅ विण्षु आंत्रे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे रामु इदे,सहसंस्थापक विजय मुठे,कटरनवरे,म्हाळु गुळवे,खंडु गोफणे. भागवत गोफणे, डाॅ.राजु चव्हाण, राजु गोफणे अनिल मंडळे,सचिन गुळवे, भाऊसाहेब मचकुले, रवि गोफणे रविंद्र गिरी भाऊसाहेब पवार,किरण जाधव राजेंद्र रावले भिमाजी चव्हाण बाळू मोरे वाळीबा गोफणे गोटीराम मचकुले श्रीकांत मचकुले दत्तात्रय शिरसाठ सुनिल मचकुले गोविंद पिंपळे पररशराम शिरंवार नारायण जेडगुले संदिप लेहकर भास्कर गोफणे संतोष सदगीर राजु वारुंगसे नानाभाऊ वारुंगसे नवनाथ गोफणे किसन सदगीर दगडू गुरकुले अभिषा वायचळे उपस्थित होते.
