
ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर यांजकडुन*——– आहुर्ली सह धारगाव, कुशेगाव परिसरात वाघ, बिबट्या आदी जंगली श्वापदाचें संचार व दर्शन अनेक नागरिकानां झाले आहेत. या शिवाय विविध वस्तीवर पाळीव प्राण्यांवर हल्ले झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. या पाश्वर्भुमी वर वनविभागाचे वतीने वरिष्ठाच्यां आदेशानुसार आहुर्ली,कुशेगाव व धारगाव परिसरात रात्रीची गस्त सुरु असुन, गावागावात, वाडी वस्तीवर जाऊन विभागाचे वतीने नागरिकाचें प्रबोधन व काळजी घेणे बाबतचे मार्गदर्शन केले जात आहे. श्रीमती कल्पना वाघेरे सहा. वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) नाशिक यांचे आदेशानुसार व श्रीमती कांचन भुसाळ वनपरिक्षेत्र अधिकारी इगतपुरी (प्रा.) यांचे मार्गदर्शनात, नियत क्षेत्र कुशेगाव सह धारगाव च्या विविध गाव वस्तीवर सोमनाथ गाढवे वनरक्षक कुशेगाव यांनी ग्रामस्थांना विविध प्रकारची माहिती देऊन त्यांचे समाधान केले आहे.

यावेळी त्यांचे समवेत श्रीमती मनीषा टोचे वनरक्षक, श्रीमती अश्विनी पाटील वनरक्षक, वनमजूर श्री रामदास बगाड,श्री आंबेकर यांनी मानव व वन्यजीव संघर्ष टाळणे कामी गाव वस्तीवर रात्री अपरात्री गस्त करून जनजागृती करण्याचे काम केले आहे. त्याबाबत नियतक्षेत्रातील ग्रामस्थ वनविभागाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार मानुन कौतुक करत आहेत.

