
नांदगाव (प्रतिनिधी ) नांदगाव तालुक्यातील बोलठाण पासून जवळच असलेल्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावरील रोहिणी बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्या व नांदगाव पंचायत समितीच्या विरोधात दिनांक 10 सप्टेंबर 2025 बुधवारपासून विविध मागण्यांसाठी रोहिले बुद्रुक येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते, संविधान आर्मी चे नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मुक्ताराम बागुल यांनी उपोषणास सुरुवात केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतला नांदगाव पंचायत समितीने प्रधानमंत्री आवास योजना घरकुल लाभार्थी यादी मधून पात्र/अपात्र लाभार्थ्यांची यादी पाठविली होती. या पत्राच्या अनुषंगाने रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी नांदगाव पंचायत समिती कडील घरकुल विभागाचे पत्र जावक क्रमांक पंसना/प्रमंआयो/05/2025 आणि ग्रामपंचायत मासिक सभा दिनांक 24 जानेवारी 2025 अन्वये सन 2024 – 25 PMAY-G टप्पा क्रमांक दोन योजनेअंतर्गत मौजे रोहिले बुद्रुक येथील प्रपत्र ड यादीत समाविष्ट असलेल्या घरकुल लाभार्थी उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यापैकी नांदगाव पंचायत समिती कार्यालयाच्या पत्रावरून ऑनलाइन कुटुंब पत्रकातील अपात्र लाभार्थ्यांची यादी पाठवली होती. परंतु नांदगाव पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी शासनाचा आदेश व रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत पत्र यादी कचराकुंडीत टाकून अपात्र लाभार्थ्यांच्या नावे त्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता वर्ग केला. त्यामुळे अधिकाऱ्याच्या विरोधात कारवाई करून त्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे
तसेच रोहिले बुद्रुक ते गिरी रस्त्याचे रोजगार हमी योजनेअंतर्गत काम केले असून हा रस्ता व्यवस्थित झालेला नसून रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या खोदलेल्या नाही व रस्त्याचे इस्टिमेट प्रमाणे कामे झालेली नाही तरी कायदेशीर चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी असे निवेदन दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी नांदगाव पंचायत समितीला दिले होते. तरी देखील नांदगाव पंचायत समितीने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. तरी संबंधितावर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे
तसेच रोहिणी बुद्रुक ग्रामपंचायतला दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ग्राम पंचायतीने अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली फक्त नादी करून मुरूम एका बाजूला टाकला तो उचलून घेतला नाही त्यामुळे पावसाचे पाणी रोहिले बुद्रुक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ तुंबते तरी हे पाणी सदरचे मुरूम दगड माती काढून सपाटी करण करून करून नाली खोदून पाणी काढून देण्यात यावे.व रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतच्या हद्दीत बहुतेक लोकांनी अतिक्रमण केलेली आहेत. त्याची प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण धारकांची यादी त्याच्या कुटुंबासहित मिळावी व तशी नोंद ग्रामपंचायतीच्या अतिक्रमण रजिस्टर मध्ये करण्यात आली व अतिक्रमण केली असल्याचे दाखले मिळावे. सदरची कारवाई न केल्यास दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी बुधवार उपोषण करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास शासन प्रशासन व ग्रामपंचायत, नांदगाव पंचायत समिती असे निवेदनात म्हटले आहे. परंतु दोन्ही विभागांनी कुठलेही प्रकारची अद्याप पर्यंत कार्यवाही केलेली नाही.
मात्र रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत अधिकारी यांनी मला दिनांक आठ सप्टेंबर 2025 रोजी त्यासंदर्भात पत्र दिले आहे. सदर पत्र म्हटले आहे की सदर अर्जाप्रमाणे रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत ने ऑगस्ट महिन्यात दिनांक 15 ऑगस्ट 2025 ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान मोठा पाऊस झाला. त्यावेळी 16 ऑगस्ट 2025 रोजी माणूस लावून पाणी काढले होते. त्या ठिकाणी पाणी नाही येत्या आठ दिवसात जेसीबी लावून नाली फोन करून भविष्यात पडणारे निसर्गाचे पाणी काढले जाईल व संबंधित ज्यांनी कोणी भरून माती आणली होती त्यांना ती घेऊन जाण्याची, उचलण्याची ग्रामपंचायत सात दिवसाची मुदत नोटीस काढलेली आहे. व सदर मुदतीत संबंधितांनी माती / मुरूम उचलला नाही तर ते ग्रामपंचायतचे आहे असे गृहीत धरण्यात येईल अशा पद्धतीची अंतिम नोटीस संबंधितांना देण्यात येईल.
मुद्दा क्रमांक दोन गावातील बहुतेक लोकांनी अतिक्रमांनी केलेली आहेत त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमण धारकांची यादी मिळावी यासंदर्भात संबंधित अधिक धारकांचे अतिक्रमण पाहणी करून त्यांना नियमानुसार नोटीस ठेवून अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस तात्काळ देऊन कार्यवाही करेल. व त्यांनी त्यानंतर देखील अतिक्रमण काढले नाही तर पुढील प्रशासकीय कार्यवाही ग्रामपंचायत करण्यास तयार आहे. तरी 10 सप्टेंबर 2025 पासून सुरू करणार असलेली उपोषणापासून परंतु उपोषण स्थगित करावी असे उपोषण करते मुक्ताराम बागुल यांना ग्रामपंचायतीने दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
सदरचे पत्र हे बिन बुडाचे असल्याचे मुक्ताराम बागुल यांनी बोलताना म्हटले आहे. मुक्ताराम बागुल यांनी पुढे बोलताना सांगितले की. मी गेल्या काही दिवसांपूर्वी बेमुदत आमरण उपोषण केले होते. त्यावेळी ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढले नाही तर फक्त नाली केली. फक्त नाली करण्यासाठी ग्रामपंचायतीने जवळ जवळ 70 ते 80 हजार रुपये खर्च केले. म्हणजेच 70 ते 80 हजार रुपयांमध्ये विकास कामे करणे ऐवजी रिकामा खर्च ग्रामपंचायत करत आहे. त्याच वेळेस नाली करण्याऐवजी संपूर्ण सपाटीकरण केले नाही. म्हणजेच त्यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी आर एम मगर यांनी राजकारण व जातिवाद करून अतिक्रमण काढली नाही फक्त डोळ्याचे पाणी पुसले. आता पुन्हा बे एक बे चा पाढा ग्रामपंचायत चे ग्रामपंचायत अधिकारी मगर यांनी सुरू केला आहे. म्हणजेच ग्रामपंचायतीचा विकास करणे ऐवजी सर्वसामान्य लोकांकडून जमा होणारा ग्रामनिधी मधून रिकामा खर्च का करते? सर्वसामान्य लोकांना वेठीस धरून कर वसुली करते आणि अधिक्रमण सारख्या कामावर खर्च करते. त्याऐवजी अतिक्रमण केलेल्या धारकाकडून वसुली का करत नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांना याबाबत काही माहिती नाही. त्यांच्यावर दबाव टाकून स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. आणि त्यांनाच ग्रामपंचायत अधिकारी नियम आणि कायदा शिकवत असल्याचे निदर्शनास आले आहे.
सर्वसामान्य लोकांचा ग्रामनिधी मध्ये जमा होणारा निधी अतिक्रमणावर खर्च करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी भाग पाडत आहे. तरी ग्रामपंचायत अधिकारी एकाच वेळेस अतिक्रमण का काढत नाही आणि त्याचा खर्च अतिक्रमणधारकांकडून वसूल का करत नाही? असा सवाल रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतचे माजी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते संविधान आर्मीचे नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मुक्ताराम बागुल यांनी उपस्थित केला आहे.
तरी मी हे सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा इशारा पुढे दिला असून पुढील भविष्यात होणाऱ्या परिणामास किंवा जीवित हानी कुटुंबासहित झाल्यास शासन प्रशासन व संबंधित अधिकारी हे राहतील असे पुढे बोलताना म्हटले आहे.
