
साकोरा ( प्रतिनिधी) नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील ग्रामपंचायत सरपंचपदी अतुल बोरसे (पाटील) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान सरपंच किरण बोरसे यांनी राजीनामा दिल्याने एक महिन्याभरापासून हे पद रिक्त होते . ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदारांच्या आदेशानुसार मंडल अधिकारी यु.के. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली 15 ग्रामपंचायत सदस्यां समोर बैठक घेण्यात आली त्यात सरपंच पदासाठी मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक अमित बोरसे (पाटील) यांचे ज्येष्ठ बंधू ग्रामपंचायत सदस्य अतुल बोरसे (पाटील) यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यु. के . गायकवाड व ए. व्ही. गावित यांनी जाहीर केले. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करण्यात आली.

माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे मविप्र संचालक अमित बोरसे (पाटील )ग्रामसेवक गणेश अमुक नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश बोरसे, रमेश अण्णा बोरसे, भारत बोरसे, संजय अहिरे, तात्या बोरसे, कांतीलाल बोरसे, शिवा बोरसे, रवींद्र बोरसे, शरद सोनवणे, प्रीतम पाटील, मधुकर सूर्यवंशी, उपसरपंच सोनाली अहिरे , ग्रामपंचायत सदस्य ताराबाई सोनवणे, घनश्याम सुरसे, मोनाली सूर्यवंशी, भालचंद्र बोरसे, वनिता बोरसे, प्रशांत बोरसे मनीषा बोरसे राजेंद्र भामरे वंदना दुरडे, वाल्याबाई कदम, दिपाली मोरे, यशोदा डोळे, नरहरी भोसले, आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.
