
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०२४ वा दिवस* तुमचे काम हेच की देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरून, खेडोपाडी हिंडून साऱ्यांना समजावून सांगावयाचे आहे. आता आळस करून चालणार नाही. आजची शिक्षणहीन, धर्महीन अवकळा त्यांना समजावून देऊन त्यांना जागे करून सांगा- ‘बंधूनो, आता सारेजण उठा! जागे व्हा! आणखी किती दिवस झोपत पडणार आहात असे ?’ शास्त्रातील महान तत्त्वे त्यांना पटवून द्या अगदी सोप्या भाषेत. याबरोबरच त्यांना सोप्या रीतीने व्यवहार, व्यापार, शेती वगैरे गृहस्थोपयोगी गोष्टींचेही शिक्षण द्या. नाही तर धिक्कार असो तुमच्या शिकण्यासवरण्याला अन् धिक्कार असो तुमच्या वेद वेदान्ताच्या अध्ययनाला.
*स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर १९ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७*
★ भाद्रपद वद्य /कृष्ण ३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. १० सप्टेंबर २०२५ ★ संकष्ट चतुर्थी
★ तृतीया /चतुर्थी श्राद्ध
★ १८७२ कसोटी क्रिकेट खेळाडू, त्यांच्या स्मरणार्थ रणजी क्रिकेट स्पर्धा खेळाली जाते, महाराजा के. एस. रणजितसिंग यांचा जन्मदिन.
★ १८८७ स्वातंत्र्यसैनिक, प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष, भारताचे दुसरे गृहमंत्री उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत यांचा जन्मदिन.
★ जागतिक आत्महत्या प्रतिबंधात्मक दिन.
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
