
नांदगाव.(प्रतिनिधी ) श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी कु. सिद्धांत अशोक मोरे याने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत(200 मीटर धावणे) *प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड झालेली आहे.*याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय एस जी राठोड साहेब व सचिव सिद्धांत दादा राठोड तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ बोरसे एस. एस. मॅडम यांनी सिद्धांत चे कौतुक केले .* सिद्धांत ने शाळेचे व आपल्या आई-वडिलांचे नाव उज्ज्वल केले आहे. हा त्याच्या परिश्रम व चिकाटीचा परिणाम आहे.

सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती बोरसे एस एस मॅडम , सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून विद्यार्थी सिद्धांत मोरे व क्रीडा शिक्षक श्री. बोरसे सर व श्री.शेलार सर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!
