
*सिन्नर (प्रतिनिधी ) आदिवासी कोळी महादेव चौथरा स्मारक प्रतिमा व आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. *रामु इदे म्हणले की*शिवरायांच्या स्वराज्याच्या हाकेने प्रेरीत झालेले व मावळी जनतेचे अस्तित्व टिकविण्यासाठी रणी लढणारे आदिवासी महादेव कोळी वीर व आदिलशाही निजामशाही कुतुबशाही मोगलशाही याविरुद्ध सह्याद्रीतील आदिवासी महादेव कोळी मावळी जनता लढत होती. इ.स.१६५० ते १६५७ च्या दरम्यान मोगलांच्या ताब्यात असलेला शिवनेरी किल्ला आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी आदिवासी कोळी महादेव वीर मोगलांविरुद्ध लढले आणि जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता.

ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला.मग चिडलेल्या मोगलांनी ह्यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी त्यांचे सह्याद्रीतील चालत असलेले बंड मोडून काढण्यासाठी मुघल बादशहा शाहजहान याने त्याचा सरदार रणदुल्ला खान याच्या नेतृत्वाखाली एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला आणि घनघोर लढाई सुरू झाली या लढाईत अनेक मावळे कामी आले.लवकरच सरनाईक खेमा रगतवान यांच्या नेतृत्वाखालील आदिवासी महादेव कोळ्यांच्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे हार पत्करावी लागली आणि सुमारे १५०० च्या वर महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले.व परत बंड उभारू नये यासाठी रणदुल्ला खान ने सरनाईक खेमा रगतवान यांच्या वंशजांना पकडून आणले मग तो तान्ह्या असो की म्हातारा या सर्वांचे त्याने अतोनात हाल करून नंतर माथ्यावर च्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.मोठा नरसंहार करण्यात आला हि लढाई नाही तर हे कपट कारस्थान होते.दिल्लीचा मुघल बादशहा शाहजहान याला समजले की हि लढाई नसून हा नरसंहार आहे.त्यामुळे तो निर्दयी न होता त्या निष्पाप जीवांचा सन्मान व्हावा यासाठी त्यांच्या मुंडक्यांवर चौथरा बांधला तोच तो काळा चौथरा आदिवासी महादेव कोळी चौथरा.या शूरवीरांनी शत्रूला शरण न जाता स्वराज्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं.अशा शूरमहावीरांना विनम्र अभिवादन! तसेच ,*महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की* ७ सप्टेंबर या दिवशी आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांची जयंती.आद्य क्रांतीवीर उमाजी राजे नाईक यांनी ब्रिटिशांविरूध्द सावकारशाही विरूद्ध सशस्त्र बंड उभारून जनतेला न्याय देण्याचं काम केलं.आद्यक्रांतिकारक असलेले उमाजी राजे नाईक,राघोजी भांगरे,भागोजी नाईक हे समकालिन क्रांतिकारक होते.त्यांनी जनतेची पिळवणुक करणा-या जुल्मी अत्याचारी इंग्रज राजवट, सावकार,जमिनदार,वतनदार यांच्याविरूध्द बंड पुकारले होते.उमाजी राजे नाईक यांनी जनतेचे शोषन करणा-यांना लुटून गोरगरीबांना आर्थिक मदत करत होते.कोणत्याही स्रीवर अन्याय अत्याचार झाल्यास ते त्या विरूध्द लढा देत होते.देशाला परकियांच्या गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी त्यांनी ब्रिटीशांना सळो की पळो करून सोडले. लोक त्यांना प्रती शिवाजी महाराज म्हणु लागले. पुढे फंद-फितुरीमुळे उमाजी राजेंना पकडले गेले. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला व त्यांना दोषी ठरवुन ३ फेब्रुवारी १८३२ ला फाशी देण्यात आले.अशा या आद्यक्रांतीवीरास विनम्र अभिवादन!*या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे सुञसंचलन विजय मुठे,व प्रास्ताविक रामु इदे तर आभार रोहित मुठे यांनी मानले* यावेळी , महामित्र दत्ता वायचळे,राघोजी ब्रिगेडचे संस्थापक रामुदादा इदे, सहसंस्थापक विजय मुठे, सावळीराम दिवे रोहित मुठे,किशोर बोऱ्हाडे, शुभम मुठे संदिप मुठे,पप्पु कांबळे प्रभाकर गाडेकर आदि उपस्थित होते.
