
नांदगाव (प्रतिनिधी )गणपती उत्सव हा महाराष्ट्र राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करतात पण उत्सव साजरा होतो पण यातून काही पर्यावरणाला काही गोष्टी अपायकारक आहेत यामुळे पाणी प्रदूषण होत असते .शासन विविध प्रसार माध्यमाचा वापर करून गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करावा असे आहवान केले जाते.गणपतीची मूर्ती शाडू मातीपासून बनवून ती घरच्या घरीच टपात विसर्जन करावे असे सांगितले जाते.

दिव्य मराठी घेल्या अनेक वर्षांपासून मातीचा गणेश ,घरातच विसर्जन उपक्रम राबवित आहे .या उपक्रमाला नांदगाव मधील नरेंद्र नगर मधील कलाशिक्षक विजय चव्हाण घेल्या ११ वर्षापासून स्वत: गणेशमूर्ती तयार करतात व आरास पर्यावरण पूरक करतात व विसर्जनही घरासमोर करतात.व इतरानाही तसे करण्यास सांगतात. या वर्षीही विजय चव्हाण यांनी घरासमोर टपात गणपती विसर्जन सहपत्नी केले.सुरवातीला नगरातील नागरिक घरासमोर जमा होऊन आरती करण्यात आली .त्यानंतर मोठ्या भक्ती भावाने गणपतीचे विसर्जन करण्यात आले . तसेच निर्माल्य तेथील झाडानभोवती खड्डा करून त्यात टाकण्यात आले.व शेवटी जमा झालेला सर्व गणेश भक्तांना प्रसादाचे वाटप केले.या विसर्जन प्रसंगी नरेंद्र नगरातील श्रीपाद मुळे,श्रावण चव्हाण,मनोहर हिरे, ,गुलाब पाटील ,योगेश महाले,नेमीचंद चव्हाण,भारत काकळीज,भास्कर आबासाहेब जाधव ,संदीप आहेर , बालगोपाळ,व महिला उपस्थित होते.
