
नांदगाव (प्रतिनिधी ) नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार राज्यमंत्री सुहास अण्णा कांदे यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव शहरातील विविध शासकीय कार्यालयात मिठाई वाटप करून साजरा करण्यात आला यानिमित्ताने नांदगाव पोलीस स्टेशन मधील पोलीस बांधवांना देखील दिवस रात्रीची परवा न करता सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मिठाई व केकचे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला याप्रसंगी पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे, व पोलीस बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा व्यापारी आघाडी उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तराज छाजेड यांनी केले तर याप्रसंगी आरपीआय जिल्हा कार्याध्यक्ष देविदास अण्णा मोरे, भाजप तालुका अध्यक्ष संजय सानप, शिवसेना माजी तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या आभार प्रदर्शन व संयोजन आरपीआय तालुका अध्यक्ष राजाभाऊ पवार यांनी केले याप्रसंगी आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र संघटक भास्करराव निकम, भाजपा शहराध्यक्ष रेखाताई शेलार, सतीश शिंदे, आर पी आय चे जिल्हा संघटक रवी गरुड, संस्थेचे माजी संचालक पुंजाराम भाबड, ओबीसी सेल अध्यक्ष दिलीप निकम सुनील काकळीज, वाल्मीक सादवे, प्रकाश काकळीज, अरुण बागुल, अशोक काकळीज, अशोक बोराळे यांच्यासह भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीचे कार्यकर्ते व नांदगावकर नागरिक उपस्थित होते
