
मनमाड (प्रतिनिधी ) येथील संत बार्णबा विद्यालयात 5 सप्टेंबर भारतरत्न माजी.राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस जो शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.अत्यंत उत्सवात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी प्राथमिकच्या 1 ली ते माध्यमिकच्या 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वर्गाचे अत्यंत सुनियोजित पद्धतीने तासिका घेऊन मुलांना शिकवण्याचा आनंद घेतला. या सर्व गोष्टींचे नियोजन वर्गशिक्षक श्री के.ए. पाटील सर यांनी केले. यानंतर झालेल्या शिक्षक सत्कार समारंभामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष संत बार्णबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.विकास कराड सर यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या कष्टाचे चीज करावे असे प्रतिपादन केले. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे प्राथमिक विभागाचे श्री.डि.यु.अहिरे सर यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्र विषयी माहिती दिली. यावेळी श्री.त्रिभुवन सर यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून कशी भूमिका असते ते समजावून सांगितले. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षक श्री.वेताळ सर त्याचप्रमाणे सौ.आहिरे मॅडम सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.इयत्ता 10 वी अ चा विद्यार्थी कु.रोनक कटारे याने माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक म्हणून तर कु.वैष्णवी माकुणे हिने प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. अतिशय आनंददायी वातावरणात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
