
नागपूर (प्रतिनिधी).नागपूर महानगरपालिका, आणि औदुंबर शिक्षण व बहुउद्देशीय संस्था नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने आज नागपूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल नागपूर जिल्ह्यातील 30 शिक्षकांना आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरुरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या सर्व शिक्षकांचा सन्मान पद्मश्री डॉ रवींद्र कोल्हे, आमदार अभिजित वंजारी ,नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महामुनी साहेब, मनपा आयुक्त अभिजित चौधरी, नागपूर जिल्हा शिक्षणाधिकारी गौतम गेडाम साहेब, महाराष्ट्र रिजनल बोर्ड ऑफ एज्युकेशन सचिव रचना सिंह, वेदप्रकाश चतुर्वेदी, रविप्रकाश चतुर्वेदी, यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या उपक्रमात नागपूर जिल्ह्यातील विविध शिक्षण क्षेत्रातील 266 शिक्षकांनी सहभाग घेतला होता, त्यानंतर सर्व शिक्षकांची मुलाखत आणि त्यांनी शिक्षण, पर्यावरण, शाळाबाह्य शिक्षण, स्पर्धा परीक्षा, आणि इतर विविध क्षेत्रातील त्यांचे कार्य यांचे प्रत्यक्ष यांचे अवलोकन केल्यानंतर त्यामधून अंतिम 30 शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.प्रा.पितांबर उरकुडे यांनी आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यां सोबतच इतर शाळेतील विद्यार्थ्यांकरिता राबविलेल्या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि कार्यशाळा आयोजन, सुंदर हस्ताक्षरा करिता अक्षरशाळाचे आयोजन, मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासकेंद्रांची निर्मिती, पर्यावरण क्षेत्रात राबविलेले विविध उपक्रम, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर राज्यशास्त्र या विषयाची ना नफा ना तोटा तत्वावरील कार्यपुस्तिका , विविध नोट्स , प्रश्नपत्रिका संच, राज्यशास्त्र विषयाच्या कार्यशाळा यांचे आयोजन, विविध विषय प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून केलेले मार्गदर्शन अशा विविध उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून या पुरस्कारासाठी निवड समितीने त्यांची निवड केली.त्यांच्या या यशाबद्दल L.A.D College Nagpur च्या प्राचार्य डॉ.पूजा पाठक, उपप्राचार्य अर्चना लिहितकर, पर्यवेक्षक सविता अनवाने आणि इतर प्राध्यापिका यांनी त्यांचे अभिनंदन केले.
