
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३०१७ वा दिवस
एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण सदा लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती ही की, दुसऱ्यांच्या कर्तव्यांकडे आपण त्यांच्याच दृष्टीतून बघितले पाहिजे. परक्या जातीच्या रीतीभाती स्वतःच्या दृष्टिकोनांतून जोखण्याची चूक आपण कदापि करता कामा नये. समस्त जगताला मोजण्याचा मानदंड वा मोजपट्टी तुम्ही वा मी नाही. आपण हें विशेषेकरून शिकावयास हवें की, आमच्या स्वतःच्या कल्पनेनुसार समस्त जग कधीच चालावयाचें नाही; आम्हांलाच जगाशी जमवून घेऊन वागावें लागेल, जग कधी आमच्या तंत्रानुसार आमच्याशी जमते घेऊन वागण्यास रिकामें नाही. असो तर, यावरून हे स्पष्ट दिसून येतें की, देश-काल-पात्रांच्या भेदानुसार कर्तव्य कितीतरी बदलत असतें; आणि एखाद्या विशिष्ट समयी आपलें जें कर्तव्य असेल तेच चांगल्या तन्हेने पार पाडीत जाणे हेच इहलोकांतील आपले सर्वश्रेष्ठ कर्म होय.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १२ भाद्रपद (नभस्यमास ) शके १९४७
★ भाद्रपद शुध्द /शुक्ल ११
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. ३ सप्टेंबर २०२५
★ परावर्तिनी एकादशी 🚩🚩🚩🚩🚩
★ १९२३ गर्जा महाराष्ट्र माझा हे अजरामर गीताचे गायक महाराष्ट्र शाहीर कृष्णराव तथा शाहीर साबळे यांचा जन्मदिन.
★ १९६७ वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक. ’मौज’ आणि ’निर्भिड’ ही साप्ताहिके त्यांनी सुरू केली. जातीयता निर्मूलनासाठी त्यांनी सहभोजनाचा उपक्रम चालविणारे अनंत हरी गद्रे तथा समतानंद यांचा स्मृतीदिन
★ २००० स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर यांचा स्मृतीदिन.
